20 May 2024 12:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Party Cruisers Share Price Today | अजून काय हवं? 100% परतावा आणि फ्री बोनस शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल, स्टॉक डिटेल्स पाहून घ्या

Party Cruisers Share Price

Party Cruisers Share Price Today | शेअर बाजारात अनेक कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांसाठी विविध लाभ जाहीर करत असतात. कंपन्या लाभांश, बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट असे विविध लाभ देऊन शेअर धारकांना आकर्षित करत असतात. अशीच एक कंपनी आहे, जिने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. सध्या जर तुम्ही बोनस वाटप करणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही ‘पार्टी क्रूझर्स लिमिटेड’ या कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजे. (Party Cruisers Limited)

मंगळवार दिनांक 18 एप्रिल ही बोनस शेअरची एक्स तारीख आणि रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित करण्यात आली होती. ही कंपनी आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना एका शेअरवर एक बोनस शेअर मोफत वाटप करणार आहे. पार्टी क्रूझर्स लिमिटेड कंपनीचा IPO दोन वर्षांपूर्वी शेअर बाजारात खुला करण्यात आला होता.

कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना एका शेअरवर एक बोनस शेअर मोफत देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या बोनस इश्यूसाठी 18 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला होता. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराचे नाव रेकॉर्ड तारीख पूर्वी कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल, कंपनी फक्त त्यांनाच बोनस शेअर्स वाटप करेल.

शेअरची परिस्थिती :
मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी पार्टी क्रूझर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 52.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ज्या लोकांनी हा कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे लावले होते, त्यांना आता पर्यंत 100 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. पार्टी क्रूझर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 मार्च 2021 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 94.40 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Party Cruisers Share Price Today on 18 April 2023.

हॅशटॅग्स

Party Cruisers Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x