3 May 2024 10:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Multibagger Stocks | कडक! तिप्पट परताव्यासाठी बँक 15 वर्ष पैसे लॉक करेल, या शेअरने 1 वर्षात 3 पट परतावा दिला

Multibagger stock

Multibagger Stocks | शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या “फिलाटेक्स फॅशन्स” कंपनीने आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. अवघ्या एक वर्षात मोजे बनवणाऱ्या या फॅशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना साडेतीन पट अधिक परतावा कमावून दिला आहे. शेअरमध्ये कमालीची खरेदी सुरू असलेल्यामुळे शेअर्सच्या किमतीने आतापर्यंतचा सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. 4 नोव्हेंबर 2022 रोजी हा शेअर बीएसई निर्देशांकावर 3.47 टक्क्यांच्या वाढीसह 17.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. स्टॉकची ही किंमत मे 2015 नंतरची उच्चांक किंमत आहे.

नोव्हेंबर 2021 पर्यंत Filatex Fashions कंपनीचे शेअर 3.86 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र, हळूहळू शेअरमध्ये खरेदीचा ट्रेंडनसुरू झाला, 19 सप्टेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 6.90 रुपये पर्यंत गेली. पण, त्यानंतर या शेअरमध्ये तुफानी तेजी सुरू झाली आणि सध्या या शेअरची किंमत 4 नोव्हेंबर 2022 रोजी 18 रुपये किमतीवर पोहोचली आहे.

एका वर्षात 370 टक्के परतावा :
मागील वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 370 टक्क्यांनी वाढले असून 4.70 लाख रुपये झाले आहेत. ही उच्चांक किंमत गाठल्यानंतर स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग सुरू झाली, आणि शेअरची किमत पडायला लागली. सध्या शेअर मध्ये थोडी घसरण झाली असून स्टॉक 17.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
Filatex Fashions कंपनी सॉक्स बनवण्याचे काम करते. ही कंपनी कापूस उत्पादनांशी संबंधित उद्योगात गुंतलेली आहे. कंपनीचे उत्पादन टस्कनी, स्मार्ट मॅन, रेनजॉन आणि बेला या ब्रँड नावा खाली बाजारात विकले जातात. कंपनीचे उत्पादन केंद्र तेलंगणातील मेडक जिल्ह्यात स्थित आहे. त्याच वेळी, कंपनीच्या मोठ्या ग्राहकांमध्ये मॅक्सवेल, व्हीआयपी ग्रुप, फिला इंडिया, आदिदास, पार्क अव्हेन्यू आणि टॉमी हिलफिगर यासारख्या मोठ्या ब्रँडचा समावेश होतो.

कंपनीच्या आर्थिक डेटाबद्दल :
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने काही खास कामगिरी केली नाही. एप्रिल-जून 2022 मध्ये या कंपनीने फक्त 4 लाख रुपये निव्वळ नफा कमावला होता. जानेवारी-मार्च 2022 मध्ये कंपनीने 2.52 कोटी रुपये नफा कमावला होता. या कालावधीत कंपनीच्या महसुलात घट पाहायला मिळाली होती. कंपनीचा महसूल जून 2022 च्या तिमाहीत 66.23 कोटी रुपयांवरून 37.98 कोटी रुपयांवर घसरला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger stock of Filatex Fashions share price return on investment on 08 November 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x