16 May 2024 8:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Emami Share Price Today | 'झंडू बाम' बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने दिला 'थंडा-थंडा कुल-कुल' परतावा, 1 लाखावर 2 कोटी परतावा

Emami Share Price Today

Emami Share Price Today | ‘नवरत्न तेल’ आणि ‘झंडू बाम’ सारखे मोठे ब्रँड बनवणाऱ्या ‘इमामी लिमिटेड’ कंपनीने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. ‘इमामी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स मागील 20 वर्षांत 5 रुपयांवरून वाढून 368 रुपयांवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सनी मागील 20 वर्षात आपल्या शेअर धारकांना दोन वेळा बोनस शेअर्सही वाटप केले होते. बोनस शेअर्समुळे गुंतवणूकदारांनी या स्टॉकमधून मल्टीबॅगर परतावा कमावला आहे. जर तुम्ही वीस वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्सवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा मिळाला असता. मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.53 टक्के वाढीसह 368.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Emami Limited)

1 लाखावर 2 कोटी परतावा :
‘इमामी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 11 जुलै 2003 रोजी 5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 360.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘इमामी लिमिटेड’ कंपनीने या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना दोन वेळा मोफत बोनस शेअर्सचे वाटप केले होते. जर तुम्ही 11 जुलै 2003 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक करून स्टॉक होल्ड केला असता तर तुम्हाला बोनस शेअर्स आणि इतर लाभ जोडून एकूण 2.16 कोटी रुपये परतावा मिळाला असता.

बोनस शेअर्सचा फायदा :
‘इमामी लिमिटेड’ कंपनीने आतापर्यंत आपल्या शेअर धारकांना दोन वेळा बोनस शेअर्स वाटप केले. या कंपनीने जून 2013 मध्ये 1 : 2 या प्रमाणात बोनस शेअर दिले होते. म्हणजेच , कंपनीने 2 शेअरवर 1 बोनस शेअर वितरीत केला होता. तर जून 2018 मध्ये कंपनीने 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. ‘इमामी लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 524.95 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 340.95 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 16006 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Emami Share Price Today on 18 April 2023.

हॅशटॅग्स

#Emami Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x