25 June 2024 11:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 26 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, Hold करावा की Sell? RVNL Share Price | आता थांबणार नाही हा PSU शेअर, काय आहे अपडेट? यापूर्वी 2100% परतावा दिला Reliance Power Share Price | स्वस्त रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टेक्निकल चार्टवर मजबूत तेजीचे संकेत Suzlon Share Price | ICICI सिक्युरिटीजने सुझलॉन शेअर्स खरेदी सल्ला, शॉर्ट टर्म मध्ये मिळेल मोठा परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने धाकधूक वाढवली, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? L&T Share Price | L&T सहित हे 5 मजबूत शेअर्स मालामाल करणार, मिळेल 34 टक्केपर्यंत परतावा
x

Policybazaar Share Price Price | पीबी फिनटेक शेअर तेजीच्या ट्रॅकवर, स्टॉक वाढीतून मोठा परतावा मिळू शकतो, तज्ज्ञांनी काय दिला सल्ला

Highlights:

  • Policybazaar Share Price
  • विम्याच्या प्रीमियममध्ये 18 टक्के वाढ नोंदवली
  • आजची शेअरची किंमत
  • ब्रोकरेज हाउस जेएम फायनान्शिअल अहवाल
  • EBITDA सकारात्मक
  • शेअर 37 टक्के कमजोर
  • आर्थिक तिमाही निकाल
Policybazaar Share Price

Policybazaar Share Price | पॉलिसीबाजार आणि पैसा बाजारची ऑपरेटर कंपनी पीबी फिनटेकच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून कमाईची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मार्च 2023 तिमाहीत पीबी फिनटेक कंपनीने मजबूत तिमाही निकाल जाहीर केले आहेत. यानंतर ब्रोकरेज हाऊसेस स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नुकसान झाले होते, मात्र आता स्टॉक तेजीत येण्यासाठी सज्ज झाला आहे.

विम्याच्या प्रीमियममध्ये 18 टक्के वाढ नोंदवली
ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, पीबी फिनटेक कंपनीने मार्च 2023 तिमाहीत अप्रतिम कामगिरी केली आहे. तिमाही आधारावर कंपनीच्या विम्याच्या प्रीमियममध्ये 18 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. एकूणच कंपनीच्या तोट्यात जबरदस्त घट झाली आहे. मार्च 2023 तिमाहीत कंपनीला 9 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे.

आजची शेअरची किंमत
मागील वर्षी पीबी फिनटेक कंपनीला 219.6 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. आज गुरूवार दिनांक 25 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.38 टक्के घसरणीसह 620.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ब्रोकरेज हाउस जेएम फायनान्शिअल अहवाल
ब्रोकरेज हाउस जेएम फायनान्शिअलने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, पीबी फिनटेक कंपनीने मार्च 2023 तिमाहीत अप्रतिम कामगिरी केली आहे. तिमाही आणि वार्षिक आधारावर पीबी फिनटेक कंपनीची टॉपलाइन वाढ 42.5 टक्के आणि 60.9 टक्के नोंदवली गेली आहे.

EBITDA सकारात्मक
त्याच वेळी कंपनीने 870 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. जो कंपनीच्या अंदाजापेक्षा 15.5 टक्के अधिक वाढला आहे. मार्च 2023 तिमाहीत, पीबी फिनटेक कंपनीचे मार्जिन 3.2 टक्के होते. यात तिमाही आधारावर 780 अंकांची वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीचा समायोजित EBITDA सकारात्मक आहे.

तिमाही आधारावर पीबी फिनटेक कंपनीच्या विम्याच्या प्रीमियममध्ये 18 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या एकूण व्यवसायाने 68 टक्के QoQ वाढ नोंदवली आहे. जीवन विमा पॉलिसींची विक्री मजबूत असल्याने कंपनीला मार्च तिमाहीत जास्त फायदा झाला आहे. पैसा बाजार कंपनीची वितरण वाढ तिमाही आधारावर 11 टक्के नोंदवली गेली आहे. कंपनीचा EBITDA देखील सकारात्मक आहे.

शेअर 37 टक्के कमजोर
PB Fintech कंपनीचे शेअर्स 15 नोव्हेंबर 2021 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. कंपनीच्या शेअरची इश्यू किंमत 980 रुपये होती. तर स्टॉक 1444 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. सध्या हा स्टॉक 620 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत आहे. स्टॉक आपल्या IPO किंमतीच्या तुलनेत 37 टक्के कमजोर झाला आहे. ते शेअरची किंमत आपल्या लिस्टिंग किमतीच्या तुलनेत 57 टक्के कमजोर झाली आहे. या स्टॉकचा वार्षिक उच्चांक 748 रुपये होता. तर नीचांक 356 रुपये होता.

आर्थिक तिमाही निकाल
मार्च 2023 तिमाहीत, पीबी फिनटेक कंपनीला 9 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 219.6 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. या कालावधीत वार्षिक आधारावर कंपनीने 61 टक्क्यांच्या वाढीसह 869 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च 2023 तिमाहीत कंपनीने विमा प्रीमियमच्या माध्यमातून 3586 कोटी रुपये संकलित केले होते.  यात मागील वर्षाच्या तुलनेत 65 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. वार्षिक आधारावर कंपनीचे कर्ज वितरण 53 टक्क्यांच्या वाढीसह 3357 कोटी रुपयेवर पोहचले आहे. कंपनीने उत्पन्नाची वाढ, नवीन व्यवसायाची वाढ आणि नवीन व्यवसायाची उच्च कार्यक्षमता हे कंपनीच्या एकूण वाढीचे घटक निश्चित केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Policybazaar Share Price today on 25 May 2023.

हॅशटॅग्स

#PolicyBazaar Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x