14 December 2024 4:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Zomato Share Price | झोमॅटो शेअरमध्ये मोठी उलाढाल सुरू, शेअर 100 टक्के परतावा देईल, पहा टार्गेट प्राईस

Zomato Share Price

Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी ‘झोमॅटो’ च्या शेअर्समध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. ‘झोमॅटो’ चे शेअर्स आज लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के घसरणीसह 53.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीतही कंपनीची आर्थिक कामगिरी तटस्थ राहण्याची शक्यता तज्ञांक वर्तवली आहे. काही ब्रोकरेज फर्म ‘झोमॅटो’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. ‘जेएम फायनाशिअल’ फर्मने ‘झोमॅटो’ कंपनीच्या स्टॉकवर 100 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 100 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Zomato Limited)

स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
ब्रोकरेज फर्म ‘जेएम फायनान्शियल’ ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, फूड डिलीव्हरी सेक्टरमधील वाढ मार्च तिमाहीत सलग तिसऱ्यांदा मंद राहण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्मनुसार कंपनीच्या व्यापार वाढीवर परिणाम करणाऱ्या प्रमुख घटकांमध्ये वाढती महागाई, जेवण-खान्याचा वाढता वाटा आणि फायदेशीर पुनर्प्राप्तीवर लक्ष केंद्रित करणे, ब्लिंकिट आणि हायपरप्युअर सारख्या क्षेत्रांमधील कंपनीच्या गुंतवणुकीला समर्थन देणे, यासारखे घटक कारणीभूत आहेत.

विशेष म्हणजे ‘गोल्ड’ लॉयल्टी सबस्क्रिप्शनची पुन्हा केलेले सुरुवात आणि 225 शहरांमधील ऑनलाईन फूड डिलिव्हरी ऑपरेशन्स बंद करणे, या सर्व गोष्टी वरून समजते की, कंपनीने व्यापार विस्तारामध्ये गुंतवणूक करण्याऐवजी उच्च गुणवत्तेच्या ग्राहक सेवावर लक्ष केंद्रित केले आहे. एकीकडे या धोरणाचा नजीकच्या MTU ट्रेडवर विपरीत परिणाम होऊ शकतो, तर दुसरीकडे ते कंपनीच्या फायदेशीर व्यापार विस्ताराला गती देऊ शकते, असे मग JM Financial फर्मने आपल्या अहवालात मांडले आहेत.

Zomato कंपनी डिटेल :
‘झोमॅटो’ कंपनीचा IPO 2021 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. Zomato कंपनीने नोव्हेंबर 2021 मध्ये IPO गुंतवणुकीसाठी खुला केला होता. आणि कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 76 रुपये निश्चित केली होती. या कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग जबरदस्त झाली होती. त्याच महिन्यात झोमॅटो कंपनीचा स्टॉक 169 रुपये पर्यंत पोहचला होता. सध्या हा स्टॉक आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीच्या तुलनेत 69 टक्के खाली ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Share Price on 11 April 2023.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x