19 May 2024 7:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Jet Infraventure Share Price | 36 रुपयाचा शेअर, कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, रेकॉर्ड डेट पहा

Jet Infraventure Share Price

Jet Infraventure Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक खुश खबर आहे. ‘जेट इन्फ्राव्हेंचर’ कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 1 शेअर बोनस मोफत वाटप करणार आहे. कंपनीने बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 36.57 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Jet Infraventure Limited)

‘जेट इन्फ्रोव्हेंचर्स’ बोनस रेकॉर्ड तारीख :
‘जेट इन्फ्राव्हेंचर’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरवर कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. कंपनीने या बोनस इश्यूसाठी 21 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे. 21 एप्रिल 2023 पर्यंत ज्या गुंतवणूकदाराचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये सामील राहील, त्यांना कंपनी बोनस शेअर्स देईल.

मागील आठवड्यात सलग तीन दिवसांत या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटला धडक देत होते. ‘जेट इन्फ्रॉनव्हेंचर’ कंपनीच्या शेअर्समध्ये या तेजीचे मुख्य कारण बोनस इश्यू असल्याचे मानले जात आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरची किंमत 46.48 टक्क्यांनी वाढली आहे. या कंपनीच्या शेअरच्या गुंतवणूकदारांसाठी मागील वर्ष फारसे चांगले गेले नाही. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 61 टक्क्यांनी कमजोर झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 90 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 22 21 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jet Infraventure Share Price on 11 April 2023.

हॅशटॅग्स

Jet Infraventure Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x