20 April 2024 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा
x

Genesys International Share Price | जबरदस्त शेअर! 3 वर्षात 1,274 टक्के परतावा, मागील 1 महिन्यात 22% परतावा दिला, खरेदी करणार?

Highlights:

  • जेनेसिस इंटरनॅशनल शेअर
  • शेअरची सध्याची किंमत
  • 3 वर्षात 1,274 टक्के परतावा
  • 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 13.74 लाख रुपये परतावा
Genesys International Share Price

Genesys International Share Price | 2020 च्या कोरोना लॉक डाऊननंतर जगातील सर्व देशातील शेअर बाजार क्रॅश झाले होते. देशांतर्गत कारणांशिवाय अनेक परकीय नकारात्मक कारणांमुळे देखील भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती.

जेनेसिस इंटरनॅशनल शेअर
रशिया-युक्रेन युद्ध, आर्थिक मंदी, जगभरातील महागाईचा दर , वाढता व्याजदर, जागतिक वाढ मंदावण्याची भीती, अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकट असे अनेक संकट पार करून देखील भारतीय शेअर बाजार अप्रतिम काम करत आहे. ज्या लोकांनी शेअर बाजाराच्या पडत्या काळात संधीचा फायदा घेतला, त्यांना अप्रतिम परतावा मिळाला आहे. आज या लेखात आपण असाच एका स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत. याचे नाव आहे, जेनेसिस इंटरनॅशनल.

जेनेसिस इंटरनॅशनल ही कंपनी भौगोलिक माहिती सेवा प्रदान करण्याच्या क्षेत्रात व्यवसाय करते. या सेवांमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना रिमोट सेन्सिंग, लोकेशन नेव्हिगेशन मॅपिंग, कार्टोग्राफी, डेटा कन्व्हर्जन, फोटोग्रामेट्री, 3D जिओमटेरियल, अशा अनेक सेवा प्रदान करते.

शेअरची सध्याची किंमत
जेनेसिस इंटरनॅशनल या स्मॉल कॅप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,333 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 25 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.09 टक्के घसरणीसह 354.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

3 वर्षात 1,274 टक्के परतावा
जेनेसिस इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घ कालीन गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1,274 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी यात 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 13.74 लाख रुपये झाले आहे.

1 लाख रुपये गुंतवणुकीवर 13.74 लाख रुपये परतावा
जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी जेनेसिस इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 13.74 लाख रुपये झाले असते. मागील एका वर्षात जेनेसिस इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरने फारशी चांगली कामगिरी केलेली दिसत नाही. मागील एका वर्षभरात या कंपनीचे शेअर्स 13.11 टक्के कमजोर झाले आहेत. मागील सहा महिन्यात या कंपनीचे शेअर्स 24.64 टक्के कमजोर झाले आहेत. मात्र मागील एका महिन्यापासून स्टॉक तेजीत आला आहे. या काळात शेअरची किंमत 22.03 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Genesys International Share Price today on 25 May 2023.

हॅशटॅग्स

Genesys International Share price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x