
HDFC & SBI Bank FD | आरबीआयने यावेळी एमपीसीमध्ये रेपो दरात वाढ न करता तो ६.५० टक्के ठेवला. यापूर्वी मे 2022 पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सहा वेळा वाढ केली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडियाने अमृत कलश स्पेशल एफडी (एफडी) योजनेची वैधता 30 जून 2023 पर्यंत वाढवली आहे. यामध्ये ४०० दिवसांच्या एफडीवर ७.१० टक्के व्याज दिले जात आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.६० टक्के व्याज दर आहे.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना ८ दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर ९ टक्के व्याज देत आहे. इतरांना याच कालावधीत ८.५ टक्के व्याज मिळत आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना ७०० दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर ९ टक्के व्याज देत आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी याच कालावधीसाठी व्याजदर ८.२५ टक्के आहे.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
युनिटी स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना १००१ दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर ९.५० टक्के व्याज मिळू शकते. इतरांसाठी याच कालावधीसाठी व्याजदर 9 टक्के आहे.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक :
ज्येष्ठ नागरिकांना १० दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर ९.०१ टक्के व्याज मिळू शकते. इतरांसाठी याच कालावधीसाठी ८.४१ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.
एचडीएफसी बँक
एचडीएफसी बँक ज्येष्ठ नागरिकांना ५ वर्षे १ दिवस ते १० वर्षे मुदतीच्या एफडीवर ७.७५ टक्के व्याज देत आहे. इतरांसाठी याच कालावधीसाठी ७ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.