15 May 2024 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | स्वस्त GTL शेअर मालामाल करणार, कंपनीकडून मोठ्या फायद्याची अपडेट आली Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा
x

Income Tax Return | खुशखबर! या लोकांना भरावा लागेल फक्त 10 टक्के टॅक्स, पहा तुम्हाला दिलासा मिळाला का?

Income Tax Return

Income Tax Return | ज्यांचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांना कर भरावा लागतो. सध्या देशात दोन वेगवेगळ्या कर प्रणालीअंतर्गत प्राप्तिकर भरला जातो. यामध्ये नवीन कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली यांचा समावेश आहे. दोन्ही कर प्रणालींमध्ये कर भरताना वेगवेगळे टॅक्स स्लॅब देण्यात आले आहेत, त्यानुसार कर भरावा लागतो.

इनकम टॅक्स रिटर्न
केंद्रीय अर्थसंकल्प 2023 सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्कम टॅक्समध्ये अनेक बदलांची घोषणा केली. या बदलांअंतर्गत करप्रणालीतही बदल करण्यात आला. तसेच इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्येही बदल करण्यात आला आहे. त्याचबरोबर नव्या करप्रणालीत बदल करण्याची घोषणा करत मोदी सरकारने ३ लाख रुपयांपर्यंत शून्य कर ठेवला आहे.

आईटीआर
यानंतर लोकांना वार्षिक 3-6 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के कर भरावा लागेल. तर जर एखाद्याचे उत्पन्न 6-9 लाख रुपये असेल तर या लोकांना 10 टक्के आयकर भरावा लागेल. जर एखाद्याचे वार्षिक उत्पन्न 9-12 लाख रुपये असेल तर या लोकांना 15 टक्के कर भरावा लागेल. यानंतर ज्यांचे उत्पन्न 12-15 लाख रुपये असेल, त्यांना 20 टक्के कर भरावा लागणार आहे. याशिवाय ज्यांचे उत्पन्न १५ लाखरुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना ३० टक्के कर भरावा लागणार आहे.

जुनी करप्रणाली
जुन्या करप्रणालीबद्दल बोलायचे झाले तर ६० वर्षांखालील वैयक्तिक करदात्यांना अडीच लाख रुपयांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही. यानंतर या लोकांना अडीच ते पाच लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर ५ टक्के कर भरावा लागणार आहे. तर वार्षिक ५ ते १० लाख रुपयांच्या उत्पन्नावर २० टक्के कर भरावा लागणार आहे. तर ज्यांचे वार्षिक उत्पन्न १० लाखरुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना ३० टक्के कर भरावा लागणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Income Tax Return this peoples will pay just 10 percent tax check details on 20 April 2023.

हॅशटॅग्स

#Income Tax Return(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x