19 May 2024 6:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Multibagger Stock | मालामाल मल्टिबॅगर शेअर! 2 वर्षात 1 लाखावर दिला 28 लाख रुपये परतावा, खरेदी करणार?

Multibagger Stock

Multibagger Stock | ‘नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे खिसे नोटांनी भरले आहेत. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. तसेच ज्या लोकांनी 2 वर्षांपूर्वी ‘नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स’ कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 28 पट वाढले आहेत. ‘नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स’ ही कंपनी सागरी अभियांत्रिकी सेवा प्रदान करण्याचे काम करते. कंपनी नौदल आणि इतर व्यावसायिक जहाजांची दुरुस्तीचे काम देखील करते. (Knowledge Marine and Engineering Works Ltd)

शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार ‘आशिष कचोलिया’ यांनी मार्च 2023 तिमाहीत ‘नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स’ कंपनीमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. मार्च 2023 तिमाहीत, त्यांनी आपली गुंतवणूक 0.19 टक्क्यांनी वाढवून 2.50 टक्केवर नेली आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत आशिष कचोलियाकडे ‘नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स’ कंपनीचे 2.31 टक्के भाग भांडवल होते. नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळवून दिला आहे.

‘नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स’ कंपनीचे शेअर्स मागील दोन वर्षात 37 रुपये वरून वाढून 1,045 रुपयेवर पोहोचले आहेत. दीर्घ काळात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अद्भूत परतावा दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2,736 टक्के परतावा दिला आहे. मागील दोन वर्षांत या शेअरची किंमत 37 रुपयेवरून वाढून 1,045 रुपयांवर पोहचली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांच्या पैशांचे मूल्य 28 पटीने वाढले आहेत.

1 लाखावर दिला 28 लाख परतावा :
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 21 एप्रिल 2021 रोजी ‘नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स’ कंपनीचे शेअर्स 37 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यावेळी जर तुम्ही या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 28 लाख रुपये झाले असते. मागील एका वर्षभरात या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट वाढवले आहे. 21 एप्रिल 2022 रोजी हा स्टॉक 230 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, जो आता 1,045 रुपयेवर पोहचला आहे. या कालावधीत शेअरची किंमत 354 टक्क्यांनी वाढली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Knowledge Marine and Engineering Works Share Price Today on 22 April 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x