25 May 2024 2:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रासह हे 5 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंगसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! टॉप 10 पेनी स्टॉक खरेदी करा, रोज अप्पर सर्किट हीट Vodafone Idea Share Price | अप्पर सर्किटनंतर पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार, मिळेल 80 टक्केपर्यंत परतावा Adani Port Share Price | ब्रेकआऊटचे संकेत! तज्ज्ञांकडून अदानी पोर्ट्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मोठी कमाई होणार SBI Special FD Interest | SBI ग्राहकांसाठी खुशखबर! खास FD वर मिळेल मोठा व्याजदर, मिळेल तगडा परतावा Quant Mutual Fund | शेअर्स नव्हे! या आहेत मालामाल करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना, सेव्ह करून ठेवा यादी My EPF Money | पगारदारांनो! EPF खात्यात पैसे असतील तर हे लक्षात घ्या, अन्यथा पसे काढताना अडचणी येतील
x

HCL Tech Share Price | एचसीएल टेक शेअर 60 टक्के परतावा देऊ शकतो, भरवशाचा शेअर खरेदी करणार?

HCL Tech Share Price

HCL Tech Share Price Today | ‘एचसीएल टेक’ या आयटी क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीने आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. मार्च 2023 तिमाहीत कंपनीने संमिश्र कामगिरी केली असूनही गुंतवणूकदारांना 900 टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तिमाही निकालानंतर आता ब्रोकरेज हाऊसेस या कंपनीच्या स्टॉकबाबत जबरदस्त उत्साही पाहायला मिळत आहेत. (HCL Technologies Limited)

सोमवार दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के वाढीसह 1,054.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार, या कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळींवरून अप ट्रेंड फॉलो करु शकतात. हा स्टॉक पुढील काळात 60 टक्के पर्यंत वाढू शकतो. चला तर मग जाणून घेऊ ब्रोकरेज फर्म या स्टॉक बद्दल काय म्हणतात?

‘एचसीएल टेक’ स्टॉकवर ब्रोकरेज हाऊसचे रेटिंग :

1) एचसीएल टेकवर सीएलएसए
रेटिंग : वाढ अपेक्षित
लक्ष्य किंमत : 1200 रुपये

2) एचसीएल टेकवरवर मॉर्गन स्टॅनली
रेटिंग : ओव्हरवेट
लक्ष किंमत : 1160

3) एचसीएल टेकवर जेपी मॉर्गन
रेटिंग : अंडरवेट
लक्ष किंमत : 880 रुपये

4) HCL टेक वर Citi
रेटिंग : न्युट्रल
लक्ष किंमत : 1035 रुपये

5) एचसीएल टेक वर जेफरीज
रेटिंग : होल्ड
लक्ष किंमत : 1125 रुपये

6) एचसीएल टेक वर नोमुरा
रेटिंग : न्युट्रल
लक्ष्य किंमत : 1100 रुपये

7) एचसीएल टेक वर मॅक्वेरी
रेटिंग : आऊटपरफॉर्म
लक्ष्य किंमत : 1580 रुपये

एचसीएल टेकचे निकाल :
आर्थिक वर्ष 202-23 च्या चौथ्या तिमाहीत एचसीएल टेक कंपनीची कामगिरी ठीकठाक म्हणता येईल. कंपनीने या तिमाहीत 3983 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 11 टक्के घट झाली आहे. एक वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीने 3593 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तिमाही आधारावर कंपनीच्या नफ्यात 2.8 टक्के घट नोंदवली गेली आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीचा EBITDA 4836 कोटी रुपये होता. डिसेंबर 2022 तिमाहीत त्यात 7.5 टक्के घट झाली होती. या तिमाहीत कंपनीचे मार्जिन 19.6 टक्के वरून 140 बेसिस पॉइंटने घसरुन 18.2 टक्केवर आले आहे.

900 टक्के लाभांश :
एचसीएल टेक कंपनी आपल्या 2 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरवर 900 टक्के लाभांश वाटप करणार आहे. म्हणजेच, कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति शेअर 18 रुपये लाभांश वाटप करेल. कंपनीच्या संचालक मंडळाने लाभांश वाटपसाठी 28 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HCL Tech Share Price Today on 24 April 2023.

हॅशटॅग्स

HCL Tech Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x