Zomato Share Price| झोमॅटो कंपनी नफ्यात येणार? तज्ञांनी दिली नवीन टार्गेट प्राईज, कंपनीचा नवीन व्यापारी करार व्यवसायाला उभारी देणार

Zomato Share Price Today | झोमॅटो या ऑनलाईन फूड एग्रीगेटर फर्म झोमॅटोच्या स्टॉकमध्ये मागील काही दिवसापासून मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. झोमॅटो कंपनीचे शेअर्स मंगळवारी 8 टक्क्यांच्या वाढीसह 50.58 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे बाजार भांडवल आता 50,000 कोटी रुपयेच्या पार गेले आहे. बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.78 टक्के वाढीसह 58.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Zomato Limited)
मागील तीन महिन्यांत झोमॅटो कंपनीचे शेअर्स 20.27 टक्के मजबूत झाले आहेत. झोमॅटो कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्याच्या आपल्या गुंतवणूकदारांना 14 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका आठवड्यात शेअरची किंमत 8 टक्के वाढली आहे. हा स्टॉक सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीपासून 50 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात झोमॅटो कंपनीच्या शेअरची किंमत 25 टक्क्यांनी कमजोर झाली होती. 25 एप्रिल 2022 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 81.65 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने झोमॅटो कंपनीच्या शेअरला बाय रेटिंग देऊन स्टॉक 70 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये झोमॅटो कंपनी नफ्यात येईल असा अंदाज ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांनी व्यक्त केला आहे.कोटक इन्स्टिट्यूशनल इब्लिटीज फर्मने देखील या कंपनीच्या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन स्टॉक 82 रुपये लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. झोमॅटो कंपनीचे शेअर्स जुलै 2021 मध्ये शेअर बाजारात लिस्ट करण्यात आले होते.
झोमॅटो कंपनीने इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप Zip इलेक्ट्रिक सोबत महत्त्वपूर्ण करार केल्याची घोषणा केली आहे. या करारा अंतर्गत झिप इलेक्ट्रिक 2024 पर्यंत झोमॅटो कंपनीला एक लाख इलेक्ट्रिक स्कूटर पुरवठा करणार आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये लास्ट माईल डिलिव्हरी सुविधेसाठी झोमॅटो कोंकणीला डिलिव्हरी पार्टनर देखील पुरवले जाणार आहे. सध्या कंपनीकडे 13,000 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहने सेवेत असून कार्बन उत्सर्जन 35 दशलक्ष किलोपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठरवले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Zomato Share Price Today on 26 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH