14 December 2024 8:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Flomic Global Logistics Share Price Today | कुबेर शेअर! 5 वर्षात करोडपती बनवणारा शेअर! फक्त 32 पैशाच्या शेअरने आयुष्य बदललं

Flomic Global Logistics Share Price

Flomic Global Logistics Share Price Today | ‘फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. 5 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स पेनी स्टॉकच्या श्रेणीत मोजले जात होते. मात्र या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. (Flomic Global Logistics Limited)

जर तुम्ही५ वर्षांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य करोडोच्या पार गेले असते. आज बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी फ्लोमिक ग्लोबल कंपनीचे शेअर्स 3.87 टक्के घसरणीसह 106.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.

‘फ्लोमिक ग्लोबल’ ही जागतिक मालवाहतूक सेवा प्रदान करणारी कंपनी मानली जाते. कंपनी जगभरातील अनेक देशांमध्ये सेवा प्रदान करते. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांनी मजबूत झाले आहे. तर मागील एका महिन्यात हा स्टॉक 26 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. ‘फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 81.07 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 181.90 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 71.60 रुपये होती.

5 वर्षात दिला 32,142 टक्के परतावा :
‘Flomic Global Logistics Limited’ कंपनीच्या स्टॉकने मागील पाच वर्षात आपल्या शेअर धारकांना श्रीमंत केले आहे. पाच वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर 35 पैसेवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 114.80 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 32,142 टक्के परतावा कमावून दिला आहे.

जर तुम्ही पाच वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरवर एक लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य करोडोच्या पार गेले असते. सध्याच्या किमतीनुसार तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 32,285,714 रुपये झाले असते. मागील दोन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 1400 टक्के नफा कमावून दिला आहे. दोन वर्षांमध्ये तुमचे 1 लाख रुपये वाढून 15 लाख रुपये झाले असते.

स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे अधिक धोकादायक असते कारण छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला मिळते. अचानक हे स्टॉक अप्पर सर्किट तोडू लागतात. आणि कधी कधी तर अशा शेअर्सची तरलताही कमी असते. ज्या मुळे स्टॉक एकदा लोअर सर्किट मध्ये अडकला तर तुम्हाला बाहेरच येऊ देणार नाही. त्यामुळे अनेकवेळा गुंतवणूकदार लोभ आणि स्वस्त किंमत पाहून अशा स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Flomic Global Logistics Share Price Today on 26 April 2023.

हॅशटॅग्स

#Flomic Global Logistics Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x