
GMDC Share Price Today | ‘गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ म्हणजेच ‘GMDC’ या गुजरात सरकारच्या मालकीच्या सूचीबद्ध सरकारी कंपनीचे शेअर्स कमालीची कामगिरी करत आहेत. बुधवारी या कंपनीच्या शेअरने 20 टक्क्यांचा अप्पर सर्किट स्पर्श केला होता. तर आज गुरूवार दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.63 टक्के घसरणीसह 152.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
GMDC Limited Stock Price Today on NSE & BSE
कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ होण्याचे कारण म्हणजे गुजरात सरकारने सूचीबद्ध कंपन्यांच्या लाभांश आणि बोनस शेअर्स संबंधित नवीन धोरण जाहीर केले आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मच्या मते, GMDC कंपनीच्या शेअर धारकांना याचा फायदा होणार आहे.
नुकताच गुजरात सरकारने आपल्या PSU कंपन्यांचे लाभांश आणि बोनस शेअर्सचे नवीन धोरण जाहीर एकल आहे. त्यामुळे गुजरात राज्य PSU चे मूल्यांकन अनेक पटींनी वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ‘गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ कंपनीचे शेअर्स काल 19.5 टक्क्यांच्या वाढीसह 158.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘गुजरात इंडस्ट्रीज पॉवर कंपनी लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकमध्ये ही 20 टक्के अप्पर सर्किट लागला होता. नवीन धोरणाच्या घोषणेनंतर ‘गुजरात स्टेट फर्टिलायझर्स अँड केमिकल्स’ कंपनीचे शेअर्स देखील 18 टक्केच्या तुफानी तेजीसह वाढत होते.
‘गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स सुद्धा 10 टक्क्यांच्या वाढीसह 686.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘गुजरात नर्मदा व्हॅली फर्टिलायझर्स अँड केमिकल्स’ कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 576.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर ‘गुजरात स्टेट पेट्रोनेट’ कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 287.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
गुजरात सरकारने आपल्या नवीन लाभांश आणि बोनस शेअर्स धोरणात PAT च्या 30 टक्के किंवा निव्वळ संपत्तीच्या 5 टक्के यापैकी जे अधिक असेल त्या दराने शेअर धारकांना दिल्या जाणाऱ्या लाभांशाची किमान पातळी निश्चित केली आहे. तथापि लाभांशाची केवळ किमान पातळी आणि कमाल स्वीकार्य पातळी घोषित करण्यात आली आहे.
गुजरात सरकारने शेअर्सचे विभाजन करणे देखील अनिवार्य केले आहे. ज्या PSU च्या शेअर्सचे बाजार मूल्य किंवा पुस्तक मूल्य त्याच्या दर्शनी मूल्याच्या 50 पट अधिक असेल अशा शेअरचे वर्तमान दर्शनी मूल्य 1 रुपयांपेक्षा जास्त असेल, असा निर्णय राज्य सरकारने आपल्या नवीन धोरणात जाहीर केला आहे.
सरकारची योजना :
गुजरात सरकारने आपल्या कंपनीच्या PAT च्या 30 टक्के किंवा निव्वळ संपत्तीच्या 5 टक्के यापैकी जे अधिक एवढं लाभांश भागधारकांना वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. लाभांशाची केवळ किमान पातळी आणि कमाल स्वीकार्य पातळी घोषित केली आहे. गुजरात सरकारने शेअर्सचे विभाजन करणे देखील बंधनकारक केले आहे, ज्यात कंपनीच्या शेअर्सचे बाजार मूल्य किंवा पुस्तक मूल्य त्याच्या दर्शनी मूल्याच्या 50 पट जास्त आहे, अशा कंपन्याचे शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय सरकणे घेतला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.