18 May 2024 1:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

Sadhana Nitro Chem Share Price | 40 पैशांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली, मिळाला 29000 टक्के परतावा, आता खरेदी करावा?

Sadhana Nitro Chem Share Price

Sadhana Nitro Chem Share Price | ‘साधना नायट्रो केम’ या कमोडिटी केमिकल इंडस्ट्रीमध्ये व्यापार करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने मागील 10 वर्षांत आपल्या शेअर धारकांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. मागील 10 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 29000 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कालावधीत ‘साधना नायट्रो केम’ कंपनीच्या शेअरची किंमत 40 पैशांवरून वाढून 120 रुपयांवर पोहचली आहे.

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 174.45 रुपये होती. त्याच वेळी, या कंपनीच्या शेअर्स 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 102 रुपये होती. मंगळवार दिनांक 2 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.49 टक्के वाढीसह 123.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

10 हजारवर दिला 30 लाख परतावा :
‘साधना नायट्रो केम’ कंपनीच्या शेअर्सने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 29863 टक्के परतावा कमावून दिला आहे. 24 मे 2013 रोजी या कंपनीचे शेअर्स 41 पैशांवर ट्रेड करत होते. साधना नायट्रो केम कंपनीचे शेअर्स 28 एप्रिल 2023 रोजी 122.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी साधना नायट्रो केम कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 29.96 लाख रुपये झाले असते.

3 वर्षात 1000 टक्के परतावा :
साधना नायट्रो केम कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1081 टक्के परतावा कमावून दिला आहे. कमोडिटी केमिकल उद्योगात गुंतलेल्या या कंपनीचे शेअर्स 27 मार्च 2020 रोजी 10.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. साधना नायट्रो केम कंपनीचे आज 2 मे रोजी 123.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी साधना नायट्रो केम कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 12.13 लाख रुपये झाले असते.

साधना नायट्रो केम ही कंपनी मुख्यतः बेसिक हेवी ऑरगॅनिक केमिकल्स, डाई इंटरमीडिएट्स आणि ऑरगॅनिक केमिकल्स बनवण्याचे काम करते. याव्यतिरिक्त ही कंपनी नायट्रोबेझिन आणि मेटा अमिनो फिनॉलचे उत्पादन देखील करते. या कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 71.63 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी 28.37 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sadhana Nitro Chem Share Price today on 02 May 2023.

हॅशटॅग्स

Sadhana Nitro Chem Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x