
Paytm Share Price| पेटीएम कंपनीचे शेअर्स 2150 रुपये या आपल्या IPO च्या इश्यू किंमतीच्या तुलनेत 70 टक्के खाली ट्रेड करत आहेत. हा स्टॉक शेअर बाजारात नोव्हेंबर 2021 मध्ये सूचीबद्ध करण्यात आला होता. तेव्हापासून पेटीएम कंपनीचे शेअर्स आपल्या IPO इश्यू किमतीला स्पर्श करू शकले नाही. मागील बऱ्याच महिन्यापासून या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव होता. मात्र 2023 या वर्षात कंपनीच्या शेअरची किंमत 23 टक्के वाढली आहे. ब्रोकरेज फर्म सध्या पेटीएम कंपनीच्या शेअरबाबत उत्साही आहेत. आयआयएफएल सिक्युरिटीज फर्मच्या तज्ज्ञांच्या मते पेटीएम कंपनीचे शेअर्स पुढील काळात मजबूत वाढू शकतात. आज मंगळवार दिनांक 2 मे रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 0.98 टक्के वाढीसह 660.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
शेअर बाजार बाजारातील तज्ज्ञांच्या मते, पेटीएम कंपनीच्या तिमाही उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. कारण या फिनटेक कंपनीने कर्ज वितरणात मजबूत सुधारणा केली आहे. पेटीएम कंपनीचे शेअर सध्या 600 रुपये ते 700 रुपये किंमत बँड दरम्यान ट्रेड करत आहेत. जर या शेअरने 700 रुपये किंमत पातळी तोडली तर अल्पावधीत हा स्टॉक 780 रुपये वाढू शकतो. म्हणून ब्रोकरेज फर्मने गुंतवणुकदारांना पेटीएम कंपनीच्या शेअर्समध्ये ‘बाय ऑन डिप’ चा सल्ला दिला आहे.
Paytm शेअर किंमत : तज्ज्ञांच्या मते पेटीएम कंपनीचे शेअर्स चार्ट पॅटर्नवर सकारात्मक दिसत आहेत. सध्या स्टॉक 600 रुपये ते 700 रुपयेच्या झोनमध्ये ट्रेड करत आहे. ज्यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक ठेवला आहे त्यांनी 600 रुपयेवर स्टॉप लॉस ठेवावा असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. Paytm शेअरची किंमत पुढील काळात 780 रुपये पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.