11 May 2024 6:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

UCO Bank Share Price Today | या सरकारी बँकेच्या FD पेक्षा याच सरकारी बँकेच्या 29 रुपयांच्या शेअरने 6 महिन्यांत 100% परतावा दिला

UCO Bank Share Price

UCO Bank Share Price | सार्वजनिक क्षेत्रातील UCO बँकेने आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाही कालावधीत कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत 86.2 टक्के जास्त नफा कमावला आहे. बँकेने 581.24 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. बँकेने बुडीत कर्जे कमी केल्यामुळे नफ्यात एवढी मोठी वाढ पाहायला मिळाली आहे.

UCO Bank Limited Stock Price on NSE & BSE

त्यामुळे मागील आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत युको बँकेने 312.18 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. बुधवार दिनांक 3 मे रोजी या बँकेचे शेअर्स 3.09 टक्के घसरणीसह 29.80 रुपये किमतीवी ट्रेड करत आहे.

मागील 6 महिन्यांत युको बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील आर्थिक वर्ष बँकेसाठी भरभराटीचे होते. युको बँकेने आपल्या आर्थिक निकालात माहिती दिली की, बँकेने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 1,862.34 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

जे आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 929.76 कोटी रुपये होते. कोणत्याही एका आर्थिक वर्षातील बँकेचा हा सर्वाधिक नफा आहे. या आर्थिक वर्षात युको बँकेने 7,343.13 कोटी रुपये निव्वळ व्याज उत्पन्न कमावला आहे. हे युको बँकेचे एका वर्षातील आता पर्यंतचे सर्वाधिक व्याज उत्पन्न आहे.

युको बँकच्या एनपीएमध्ये मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळाली आहे. युको बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता म्हणजेच एनपीए चौथ्या तिमाहीत 4.78 टक्के नोंदवली गेली होती, जी एका वर्षापूर्वी 7.89 टक्के होती. म्हणजेच बँकेच्या NPA मध्ये मोठी घट झाली आहे. त्याचप्रमाणे बँकेचा निव्वळ एनपीएही 2.7 टक्क्यांवरून घसरुन 1.29 टक्के झाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | UCO Bank Share Price Today on 03 May 2033.

हॅशटॅग्स

UCO Bank Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x