13 December 2024 4:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
x

Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समधील हालचालींचे नेमके कारण काय? शेअरची कामगिरी आणि परतावा चेक करा

Reliance Infra Share Price

Reliance Infra Share Price | मागील काही दिवसांपासून अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्येही जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आज शेअरच्या तेजीला ब्रेक लागला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 157.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

सप्टेंबर 2022 मध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 201.35 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमत पातळीवर ट्रेड करत होते. जुलै 2022 मध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 100.75 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 1.60 टक्के घसरणीसह 159.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 375 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांच्या कालावधीत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 100 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील एक वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 51.04 टक्के नफा कमावून दिला आहे. 2008 मध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर शेअर 2500 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जेव्हा संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या गर्तेत अडकले होते, तेव्हा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 2500 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आपल्या तीन रस्त्यांच्या मालमत्ता विकणार आहे, अशी बातमी शेअर बाजारात येताच गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदीला सुरुवात केली. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या या तीन रस्ते मालमत्ता खरेदीमध्ये क्यूब हायवेज, ब्रुकफील्ड आणि कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्डनी गुंतवणूकीची इच्छा व्यक्त केली आहे. या मालमत्तांचे मूल्य 2,000 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या अखत्यारीत महाराष्ट्रात पुणे सातारा टोल रोड, होसूर कृष्णागिरी टोल रोड आणि सेलम उलेंदरपेट टोल रोड या मालमत्ता विकण्याची तयारी करत आहे. या तीनही टोल रस्त्यांची लांबी 350 किमी आहे. रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण 700 किमी लांबीचे नऊ चालू रस्ते प्रकल्प सामील आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Infra Share Price today on 21 July 2023.

हॅशटॅग्स

Reliance Infra Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x