16 May 2024 5:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

TTML Share Price | टीटीएमएल शेअर्समध्ये पुन्हा खरेदी वाढली, पाच दिवसात 8.84 टक्के परतावा, फायदा घ्यावा? सविस्तर वाचा

TTML Share Price

TTML Share Price | टाटा समूहाच्या भाग असलेल्या टाटा टेलीसर्विसेज महाराष्ट्र लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे. 18 जुलै 2023 रोजी टाटा टेलीसर्विसेज महाराष्ट्र लिमिटेड कंपनीचे शेअर्स 73.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 19 जुलै 2023 रोजी टाटा टेलीसर्विसेज महाराष्ट्र लिमिटेड कंपनीचे शेअर्स 80 रुपये किमतीवर ओपन झाले होते आणि दिवसभरात शेअर 86.80 रुपये किमतीवर पोहोचले होते.

मागील तीन दिवसांत टाटा टेलीसर्विसेज महाराष्ट्र लिमिटेड स्टॉक 17 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये TTML स्टॉक 7.23 टक्क्यांच्या वाढीसह 86.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी टाटा टेलीसर्विसेज महाराष्ट्र लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.40 टक्के वाढीसह 83.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 5 दिवसात टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 8.84 टक्के वाढले आहेत. मागील एका महिन्यात टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 13.45 टक्के मजबूत झाले आहेत. मागील सहा महिन्यांत टीटीएमएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना फारसा परतावा दिला नाही, मते शेअरची किंमत 0.12 टक्के वाढली आहे. 2 जानेवारी 2023 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 91.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि एप्रिल 2023 पर्यंत हा स्टॉक 50 रुपयेपर्यंत घसरला होता. 12 जून 2023 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 81 रुपये किमतीवर पोहोचले होते.

मागील एका वर्षात टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 28.97 टक्के कमजोर झाले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना नक्कीच नुकसान सहन करावा लागला आहे. YTD आधारे देखील टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 9.48 टक्के घसरले आहेत. टीटीएमएल कंपनीच्या शेअरची स्ट्रेंथ सिग्नल लाइन MACD ला क्रॉसओवर करत आहे. मागील तीन तिमाहीत टीटीएमएल कंपनीच्या तिमाही निव्वळ नफ्यात वाढ झाली आहे.

टीटीएमएल कंपनी मागील 2 वर्षापासून निव्वळ रोख प्रवाह निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे. मागील 2 वर्षापासून कंपनीच्या वार्षिक निव्वळ नफ्यात सुधारणा पाहायला मिळत आहे. टीटीएमएल कंपनीच्या प्रवर्शेतकांचे शेअर्स तारण प्रमाण शुन्य आहे. लघु, मध्यम आणि दीर्घकालीन मूव्हिंग सरासरी किमतीपेक्षा शेअरची CMP किंमत MACD सिग्नल लाइनच्या वर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price today on 21 July 2023.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x