
Stocks To Buy | शेअर बाजारात असे अनेक कंपन्याचे शेअर्स आहेत, जे अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देऊ शकतात. आज या लेखात आपण अशा शेअर्स बद्दल जाणून घेणार आहोत, ज्याबद्दल तज्ञ खूप उत्साही असून पुढील 2-3 महिन्यांसाठी गुंतवणूक करण्याची शिफारस करत आहेत. तज्ञांनी 100 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या 3 स्वस्त शेअर्सवर सट्टा पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. चला जाणून घेऊ या शेअरची लक्ष किंमत
आयडीएफसी फर्स्ट बँक :
आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 63.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 65.25 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 28.95 रुपये होती. तज्ञांनी या बँकेचे शेअर्स 80 रुपये टार्गेट किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि 53 रुपयेवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
UCO बँक :
या बँकेचे शेअर्स आज गुरूवार दिनांक 4 मे रोजी 28.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. पुढील काळात हा स्टॉक 45 रुपये पर्यंत वाढू शकतो. तज्ञांनी स्टॉकवर 22 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल लिमिटेड :
आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 62.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांनी या स्टॉकसाठी 75 रुपये टार्गेट किंमत निश्चित केली आहे. आणि 49 रुपयेवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील 5 दिवसांत या कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.