
आयपीओची प्राइस बैंड :
‘अरिस्टो बायोटेक अँड लाइफ सायन्सेस लिमिटेड’ कंपनीने आपल्या IPO च्या माध्यमातून 18,12,800 शेअर्स खुल्या बाजारात विकून 1,305.22 लाख रुपये भांडवल उभारण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. कंपनीने एका IPO लॉटमध्ये 1,600 शेअर्स जारी केले आहेत, ज्याची किंमत कंपनीने प्रति शेअर 72 रुपये निश्चित केली आहे. ग्रे मार्केट फॉलो करणाऱ्या तज्ञांच्या मते, या कंपनीचा IPO 18 जानेवारी 2023 रोजी 15 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीचा IPO स्टॉक 27 जानेवारी 2023 रोजी NSE-SME निर्देशांकावर सूचीबद्ध केला जाईल.
‘अरिस्टो बायोटेक अँड लाइफ सायन्सेस लिमिटेड’ कंपनी मुख्यतः कृषी व्यवसाय करते. या कंपनीच्या IPO मध्ये एकूण इश्यू शेअर्सपैकी 50 टक्के म्हणजेच 8,60,800 शेअर्स NHI साठी राखीव ठेवण्यात आले आहेत. उर्वरित 50 टक्के म्हणजे 8,60,800 शेअर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. अरिस्टो बायोटेक कंपनी ही कृषी क्षेत्र व्यवसायात कार्यरत कंपनी आहे. कंपनी मुख्यतः शेतीसाठी लागणारे कीटकनाशके बनवते. कंपनीचे प्रवर्तक नरेंद्र सिंग बरहत, कुसुम नरेंद्र सिंग बरहत, आणि केतनकुमार हरकांतभाई जोशी हे आहेत.
कंपनी आपले उत्पादने भारतातील 20 राज्ये आणि 15 देशांमध्ये विकते. कंपनीचे 182 उत्पादने CIB & RC मध्ये नोंदणीकृत असून ते ISO 9000 : 2015 आणि SMERA SME3 अंतर्गत प्रमाणित आहे. कंपनीचे मुख्य कृषी रसायन आणि कीटकनाशक उत्पादन आणि पॅकेजिंग युनिट गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी कार्यरत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.