
UH Zaveri Share Price Today | मागील काही दिवसापासून शेअर बाजारात सुरू असलेली तेजी आज काही प्रमाणात थांबली होती. आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. मते एक स्टॉक असा होता जो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालत होता. हा स्टॉक आहे, ‘यूएच झवेरी’ कंपनीचा. या स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल 42.81 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 16.54 टक्के वाढीसह 56.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
‘यूएच झवेरी’ कंपनीचे शेअर्स अशा काही शेअर्स पैकी एक आहे, ज्यानी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. एक वर्षापूर्वी ‘यूएच झवेरी’ कंपनीचे शेअर्स 10.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 56 रुपयेवर पोहचला आहे.
मागील एका वर्षभरात या कंपनीचे शेअर्स 31.65 रुपये म्हणजेच जवळपास 305.80 टक्के मजबूत झाले आहेत. जर तुम्ही एक वर्षभरापूर्वी यूएच झवेरी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 305.80 टक्के वाढून 4 लाख रुपये झाले असते.
यूएच झवेरी कंपनीचा नफा 130.86 टक्के आणि महसुल उत्पन्न 262.6 टक्के वाढले आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये इतकी वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीची जबरदस्त आर्थिक कामगिरी आहे. या कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 63.76 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. स्मॉलकॅप स्टॉक किमतीमधील उच्च अस्थिरतेमुळे जोखीम जास्त असते, म्हणून पैसे बुडण्याच्या धोका अधिक असतो. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 95.74 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.