12 December 2024 3:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे
x

Penny Stocks | या 20 रुपयाच्या पेनी स्टॉकने झटपट 50 टक्के परतावा दिला, शेअर खरेदी करून फायदा घेणार का?

Penny Stocks

Penny Stocks | ‘पटेल इंजिनिअरिंग’ या सिव्हिल कन्स्ट्रक्शन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स दोन महिन्यांपूर्वी आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ज्या गुंतवणूकदारांनी या काळात शेअर खरेदी केले होते, त्यांना अवघ्या दोन महिन्यांत 50 टक्के परतावा मिळाला आहे. मागील पाच दिवसात शेअरची जबरदस्त वेगात वाढली आहे.

स्टॉकमधील वाढीचे मुख्य कारण म्हणजे कंपनीला 451.28 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. आज शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के वाढीसह 20.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,519.38 कोटी रुपये आहे.

कंपनीची ऑर्डर प्राप्ती :
‘पटेल इंजिनिअरिंग’ कंपनी मुख्यतः अभियांत्रिकी जलविद्युत आणि सिंचन क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी धरणे, पूल, बोगदे, रस्ते आणि विविध प्रकारच्या अवजड स्थापत्य अभियांत्रिकी कामात गुंतलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाकडून ‘कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प’ उपसा सिंचन योजना 01 आणि कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प उपसा सिंचन योजना 02 साठी कंपनीने कंत्राट मिळवले आहे. ‘पटेल इंजिनिअरिंग’ कंपनीची 01 प्रकल्पामध्ये 51 टक्के आणि योजना 02 प्रकल्पामध्ये 60 टक्के भागीदारी असणार आहे. या दोन्ही प्रकल्पाचे एकूण मूल्य 451.28 कोटी रुपये असेल.

शेअरची कामगिरी :
19 ऑगस्ट 2022 रोजी ‘पटेल इंजिनिअरिंग’ कंपनीचे शेअर्स 26.66 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तथापि त्यानंतर शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि शेअरची किंमत पडली. अवघ्या सहा महिन्यांत शेअरची किंमत 51 टक्क्यांनी घसरली होती. तर 27 फेब्रुवारी 2023 रोजी हा स्टॉक 13.10 रुपये या आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. आता मात्र शेअरमध्ये पुन्हा खरेदी वाढली असून स्टॉक 50 टक्के वाढला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks of Patel Engineering Share Price Today on 28 April 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(558)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x