5 May 2024 6:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

RVNL Share Price Today | 6 महिन्यांत गुंतवणूकदाराना 153 टक्के परतावा देणारा शेअर, तुफान तेजीतील शेअर खरेदी करणार?

RVNL Share Price

RVNL Share Price Today | ‘रेल विकास निगम लिमिटेड’ या सरकारी मालकीच्या कंपनीबाबत मोठी बातमी आली आहे. ‘RVNL’ या सरकारी कंपनीला ‘नवरत्न दर्जा’ देण्यात आला आहे. पूर्वी ही कंपनी ‘मिनीरत्न दर्जा’ असलेली कंपनी होती. ‘रेल विकास निगम लिमिटेड’ ही कंपनी रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत व्यवसाय करते. सध्या भारतात नवरत्न कंपन्यांची संख्या 13 झाली आहे. मागील एका वर्षात ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

Rail Vikas Nigam Limited Stock Price Today on NSE & BSE

25 मे 2022 रोजी RVNL कंपनीचे शेअर्स 30.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 11 महिन्यांत RVNL कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 241 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 105 रूकाये किमतीवर पोहचला होता. आज शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.31 टक्के वाढीसह 107.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

या कालावधीत RVNL कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 241 टक्के परतावा मिळवून दिला आहे. रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 114.62 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 29 रुपये होती.

RVNL कंपनीच्या शेअर्सने मागील सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदाराना 153 टक्के नफा कमावून दिला आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यात 153 टक्क्यांनी वर गेले आहे. 27 ऑक्टोबर 2022 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स 41.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 एप्रिल 2023 रोजी RVNL कंपनीचे शेअर्स 105 रुपयांवर पोहचले होते. मागील एका महिन्यात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 62.54 टक्के मजबूत झाले आहेत.

रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीला नुकताच नवरत्न दर्जा देण्यात आला आहे. याचा कंपनीला पुढील काळात भरपूर फायदा होणार आहे. यासोबतच कंपनीला गुंतवणूक, संयुक्त उपक्रम तयार करणे आणि इतर आर्थिक निर्णय घेण्याच्या बाबतीत अधिक स्वायत्तता प्राप्त झाली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये रेल विकास निगम लिमिटेड कंपनीची वार्षिक उलाढाल 19381 कोटी रुपये नोंदवली गेली होती, यात कंपनीने 1087 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| RVNL Share Price today on 28 April 2023

हॅशटॅग्स

RVNL Share Price(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x