19 May 2024 10:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Macrotech Developers Share Price | ही कंपनी मोफत बोनस शेअर्स आणि लाभांश वाटप करणार, गुंतवणुकदारांना होणार दुहेरी फायदा

Macrotech Developers Share Price

Macrotech Developers Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आली आहे. ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ ही लार्ज कॅप कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. या बोनस इश्यूसाठी कंपनीने रेकॉर्ड तरिखेची घोषणा केली आहे. कंपनीची एक्स बोनस तारीख या महिन्यातच आहे. ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 43,186.64 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.35 टक्के वाढीसह 917.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बोनस स्टॉक रेकॉर्ड डेट :
मॅक्रोटेक डेव्हलपर्सए कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरवर एक बोनस शेअर मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने या बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेट म्हणून 26 मे 2023 हा दिवस निश्चित केला आहे. म्हणजेच 26 मे 2023 रोजी ज्या शेअर धरकानाचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये सामील राहील त्यांना कंपनी मोफत बोनस शेअर्स वाटप करेल.

मार्च तिमाहीची कामगिरी : मार्च 2023 तिमाहीत मॅक्रोटेक डेव्हलपर्स कंपनीने 3255.38 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या या तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या महसुलात 5.50 टक्के घट झाली आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 3444.56 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत मॅक्रोटेक डेव्हलपर्स कंपनीने 3271.71 कोटी रुपये निव्वळ कमाई केली होती.

कंपनीने आपल्या तिमाही निकालासोबत लाभांश वाटप करण्याची घोषणा देखील केली आहे. या कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 2 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 20 टक्के लाभांश देणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Macrotech Developers Share Price today on 08 May 2023.

हॅशटॅग्स

Macrotech Developers Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x