13 May 2024 1:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Refund | नोकरदारांनो! तुम्हाला ITR रिफंड कधी मिळणार? पैसे लवकर मिळतील, महत्वाची माहिती जाणून घ्या Adani Enterprises Share Price | मल्टीबॅगर अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सपोर्ट लेव्हल वर टिकणार? पुढची टार्गेट प्राईस? Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जोरदार घसरण, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक चार्ट पॅटर्नने चिंता वाढवली, शेअर किती घसरणार? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस! स्टॉक प्राईस सुद्धा स्वस्त, खरेदीला ऑनलाईन गर्दी Kuber Yog 2024 | कुबेर योग 'या' 4 राशींच्या लोकांसांठी भाग्यशाली, यामध्ये तुमची नशीबवान राशी आहे का? Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
x

Manappuram Finance Share Price| मणप्पुरम फायनान्स कंपनीवरील छापे वाईट हेतूने प्रेरित होते? कंपनीच्या सीईओने दिले स्पष्टीकरण, जाणून घ्या तपशील

Manappuram Finance Share Price

Manappuram Finance Share Price| ‘मणप्पुरम फायनान्स लिमिटेड’ या केरळ स्थित नॉन बँकिंग फायनान्स कंपनीने असा दावा केला आहे की, ‘अंमलबजावणी संचालनालय’ म्हणजेच ED द्वारे ‘मणप्पुरम ऍग्रो फार्म्स’ या बंद झालेल्या कंपनीवर टाकण्यात आलेले छापे दुर्भावनापूर्ण आहेत. ईडीने नुकताच ‘मणप्पुरम फायनान्स लिमिटेड’ कंपनीची 143 कोटी रुपये मूल्याच्या मालमत्तेवर जप्ती आणली आहे. आज सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.69 टक्के वाढीसह 109.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

4 मे 2023 रोजी ED तर्फे माहिती देण्यात आली होती की, मनी लाँडिंगच्या चौकशी दरम्यान छापे टाकल्यानंतर ‘मणप्पुरम फायनान्स लिमिटेड’ कंपनीचे एमडी आणि सीईओ ‘व्हीपी नंदकुमार’ यांची 143 कोटी रुपये मूल्याची मालमत्ता जप्त केली जात आहे. मीडियाला दिलेल्या माहितीमध्ये, नंदकुमार यांनी सांगितले की ईडीने कंपनीच्या आवाराला जी भेट दिली होती, त्याचा ‘मणप्पुरम फायनान्स’ कंपनीशी काहीही संबंध नाही.

नंदकुमार यांनी सांगितले की, “ईडीने टाकलेले छापे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध वैयक्तिक वैर असलेल्या एका व्यक्तीने दाखल केलेल्या दुर्भावनापूर्ण तक्रारीची चौकशीची करण्यासाठी होता. हे 10 वर्षे जुने प्रकरण आता बंद पडलेल्या ‘मणप्पुरम अॅग्रो फार्म्स’ या कंपनीशी संबंधित होते. ईडीने या छापेमारीमध्ये 140 कोटी रुपये मूल्याचे नाही तर सुमारे 2,000 कोटी रुपयांचे शेअर्स जप्त केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली”. मात्र ईडीने या छापेमारीत 140 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असल्याची माहिती दिली आहे.

स्टॉकची स्थिती :
‘मणप्पुरम फायनान्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 13 टक्के घसरणीसह 105.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.69 टक्के वाढीसह 109.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Manappuram Finance Share Price Today on 08 May 2023.

हॅशटॅग्स

Manappuram Finance Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x