
Mahanagar Gas Share Price | ‘महानगर गॅस लिमिटेड’ म्हणजेच ‘एमजीएल’ या सीएनजी, पीएनजी, आणि एलएनजी वायूचा पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहेत. आज बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी महानगर गॅस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.03 टक्के वाढीसह 1,085.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीचे आर्थिक निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 999.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
तिमाही कामगिरी :
जानेवारी-मार्च 2023 च्या तिमाहीत महानगर गॅस लिमिटेड कंपनीच्या नफ्यात 104 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. महानगर गॅस कंपनीने मार्च 2023 च्या तिमाहीत 268 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. महानगर गॅस कंपनीने मागील वर्षी याच तिमाही कालावधीत 131.80 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत महानगर गॅस लिमिटेडच्या कंपनीचे एकूण उत्पन्न 49 टक्के वाढीसह 1805.45 कोटी रुपयेवर पोहचले होते. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीचा महसूल उत्पन्न 1201.30 कोटी रुपये होता.
शेअरची लक्ष किंमत :
महानगर गॅस लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीसाठी प्रति शेअर 16 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासह आर्थिक वर्ष 2023 साठी कंपनीने गुंतवणुकदारांना 26 रुपये लाभांश वाटप केला आहे. ब्रोकरेज हाऊस जेएम फायनान्शियल फर्मने महानगर गॅस लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन स्टॉक 1,150 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.