3 May 2024 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड
x

Kansai Nerolac Paints Share Price | कान्साई नेरोलॅक कंपनीचे शेअर्स तेजीत, कंपनी बोनस शेअर्स आणि लाभांश वाटप करणार

Kansai Nerolac Paints Share Price

Kansai Nerolac Paints Share Price | ‘कान्साई नेरोलॅक’ या पेंट बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर तेजी पाहायला मिळत आहे. यामुळे मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 443.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.65 टक्के वाढीसह 407.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मार्च 2023 तिमाहीत कंपनीच्या PAT मध्ये नफ्यात 401.56 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. यासोबत कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा देखील केली आहे.

बोनस शेअर तपशील :
‘कान्साई नेरोलॅक’ कंपनीने मार्च तिमाहीच्या पार्श्वभूमीवर आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कान्साई नेरोलॅक कंपनीने माहिती दिली की, संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच संचालक मंडळाने शेअर धारकांना 270 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 2.70 रुपये लाभांश वाटप करेल.

मार्च 2023 तिमाहीत कंपनीची कामगिरी :
मार्च 2023 तिमाहीत ‘कान्साई नेरोलॅक’ कंपनीने 96.24 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. या चौथ्या तिमाहीत कंपनीने 1753.59 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या महसुलात 12.81 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ‘कान्साई नेरोलॅक’ कंपनीचा EBITDA मार्जिन 363 अंकांनी सुधारला आहे.

मागील एका महिन्यात ‘कान्साई नेरोलॅक’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 5.30 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर कान्साई नेरोलॅक कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 8.12 टक्के घसरले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 535.90 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 359.15 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kansai Nerolac Paints Share Price Today on 10 May 2023.

हॅशटॅग्स

Kansai Nerolac Paints Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x