
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. मागील तीन दिवसांपासून, टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के वाढीसह 511.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
स्टॉक बाबत तज्ञांचे मत :
इक्विटी टेक्निकल अँड डेरिव्हेटिव्हज फर्म एंजल वनच्या तज्ज्ञांच्या मते, टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स ऑटो सेक्टरमध्ये मजबूत कामगिरी करणाऱ्यां स्टॉकपैकी एक आहे. स्टॉक मध्ये जबरदस्त वाढीचे संकेत मिळत आहेत. म्हणून तज्ञांनी शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
लाभांश घोषणा :
टाटा मोटर्स कंपनीचे Q4FY23 चे निकाल 12 मे रोजी जाहीर केले जातील. या तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीच्या मजबूत महसूल कमाईचे आकडे येणे अपेक्षित आहे. टाटा मोटर्स कंपनी 31 मार्च 2023 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाचे लाभांशही वाटप करणार आहे. लाभांश जाहीर झाल्यास FY16 नंतरचा पहिलाच लाभांश असेल. 2016 मध्ये टाटा मोटर्स कंपनीने प्रति इक्विटी शेअर 0.20 रुपये लाभांश वाटप केला होता. आता तब्बल 6 वर्षानंतर कंपनी पून्हा एकदा लाभांश वाटप करणार आहे. तज्ञांनी FY26 साठी टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकवर प्रति शेअर 715 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. म्हणजेच सध्याच्या बाजार भावापेक्षा गुंतवणुकदारांना 41 टक्के नफा मिळू शकतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.