14 December 2024 10:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर
x

IREDA Share Price | 64 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार? फक्त 2 दिवसात दिला 64 टक्के परतावा, वेळीच एंट्री घेणार?

IREDA Share Price

IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच आयआरईडीए या सरकारी कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीच्या शेअरने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात खळबळ उडवून दिली आहे. आयआरईडीए कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 56 टक्के प्रीमियम वाढीसह 50 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत.

शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासुन आयआरईडीए कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीसह वाढत आहे. आज गुरूवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 8.25 टक्के वाढीसह 64.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांच्या वाढीसह 59.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. IPO मध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी 32 रुपये नफा मिळाला आहे. आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 85 टक्के वाढवले आहेत. आयआरईडीए कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर 2023 तर 23 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या सरकारी कंपनीच्या IPO चा आकार 2150.21 कोटी रुपये आहे.

आयआरईडीए कंपनीचा IPO 38.80 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या कंपनीच्या IPO मधील किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 7.73 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 24.16 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 104.57 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.

आयआरईडीए कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यासाठी राखीव ठेवलेला कोटा 9.80 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदार या IPO मध्ये किमान 1 लॉट आणि कमाल 13 लॉट खरेदी करू शकत होते. आयपीओपूर्वी कंपनीमध्ये भारत सरकारने 100 टक्के भाग भांडवल धारण केले होते. हे प्रमाण आता IPO नंतर 75 टक्केवर आले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IREDA Share Price today on 30 November 2023

हॅशटॅग्स

IREDA Share Price(126)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x