11 May 2024 10:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पगारदारांनो! बचत रु.100, जमा होतील 10 लाख 80 हजार रुपये, परतावा मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये Post Office Scheme | या आहेत पोस्ट ऑफिसच्या 4 सुपरहिट योजना, जबरदस्त कमाईसह मिळेल मोठा परतावा Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला
x

Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअरमध्ये कमालीची अस्थिरता, कंपनी मोठे निर्णय घेणार, शेअरवर काय परिणाम?

Adani Enterprises Share Price

Adani Enterprises Share Price | ‘अदानी एंटरप्रायझेस’ या अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. काल हा स्टॉक 4 टक्क्यांच्या वाढीस 1972.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 0.64 टक्के घसरणीसह 1,972.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 1892.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 4189.55 रुपये होती. तर अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 3 फेब्रुवारी 2023 रोजी 1017.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

हिंडनबर्ग रिसर्च फर्मच्या अहवालानंतर सुमारे 4 महिन्यांनंतर अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअरमध्ये चढ उताराचा चक्र अजूनही सुरूच आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनी आता पुन्हा एकदा भांडवल उभारण्याची तयारी आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनी स्टॉक विक्रीद्वारे भांडवल उभारू शकते.

स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत अदानी एंटरप्रायझेस कंपनीने म्हटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 13 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी स्टॉक विक्री करून भांडवल उभारणी करण्याचा विचार करू शकते.

24 जानेवारी 2023 रोजी अदानी समूहातील कंपन्याबाबत हिंडेनबर्ग रिसर्च फर्मने अहवाल जाहीर केला. 24 जानेवारी 2023 च्या किंमत पातळीपेक्षा शेअर्स अजूनही 43 टक्के कमजोर आहे. यानंतर अदानी समूहातील.सर्व कंपन्यांचे शेअर्स कोसळले होते. अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्सही 1017.10 रुपयांवर पोहचले होते. मात्र त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली रिकव्हरी पाहायला मिळाली होती. अदानी समूहाने नुकताच यूएस स्थित गुंतवणूक फर्म GQG गुंतवणूकदारांना शेअर्स विकून सुमारे 1.9 अब्ज डॉलर्स भांडवल उभारणी केली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Enterprises Share Price today on 12 May 2023.

हॅशटॅग्स

#Adani Enterprises Share Price(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x