11 December 2024 6:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

बेपत्ता अब्जाधीश जॅक मा एका कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी

Jack Ma, Rural education, Video conference

नवी दिल्ली, १९ जानेवारी: मागील अनेक दिवसांपासून गायब असलेले आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती जॅक मा (Jack Ma) यांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. अलिबाबा या ई कॉमर्स कंपनीचे संस्थापक असलेले जॅक मा यांचा हा व्हिडीओ चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने जारी केला आहे. जॅक मा हे ग्रामीण शिक्षणासंदर्भातील एका कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.

ग्रामीण शिक्षक पुरस्कार सोहळ्याला जॅक मा यांनी उपस्थिती लावली. दरवर्षी हा कार्यक्रम होतो. जॅक मा फाऊंडेशनद्वारे 2015 पासून हा सोहळा आयोजित केला जातो. दरम्यान, नुकत्याच झालेल्या या सोहळ्यात जॅक मा यांनी देशभरातील 100 ग्रामीण शिक्षकांशी संवाद साधला. कोरोना संपल्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटू असं अलिबाबांनी यावेळी शिक्षकांना सांगितलं. अलिबाबा कंपनीचं मुख्यालय याच जेजियां प्रांतात आहे.

अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांच्याकडे ग्राहकांची माहिती आहे. त्यांच्याकडे असलेल्या माहितीचं मोल त्यांच्या संपत्तीइतकंच मोठं आहे. चीनमधील कम्युनिस्ट सरकारला हीच माहिती मा यांच्याकडून हवी आहे. यासाठी सरकारकडून बऱ्याच कालावधीपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु जॅक मा यांनी अशा प्रकारचा तपशील देण्यास विरोध केला आहे. जॅक मा यांच्या एंट समूहाकडे कोट्यवधी ग्राहकांचा तपशील आहे. चीनमधील वित्तीय नियामक संस्थेला हा तपशील हवा आहे. त्यासाठी मा यांच्यावर बराच दबाव आणला जात आहे.

 

News English Summary: The first video of Jack Ma, Asia’s richest businessman, who has been missing for the past several days, has surfaced. The video of Jack Ma, the founder of e-commerce company Alibaba, has been released by China’s official newspaper Global Times. Jack Ma was involved in a rural education event via video conference.

News English Title: Jack Ma was involved in a rural education event via video conference news updates.

हॅशटॅग्स

#China(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x