15 May 2024 9:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Chalet Hotels Share Price | शॅलेट हॉटेल्स कंपनीच्या शेअरने 3 वर्षांत 302 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस पहा, खरेदी करणार?

Chalet Hotels Share Price

Chalet Hotels Share Price | ‘शॅलेट हॉटेल्स लिमिटेड’ या हॉटेल आणि रिसॉर्ट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीसाठी विक्री आणि मार्जिनच्या बाबतीत मार्च 2023 तिमाही सर्वोत्तम गेली आहे. जबरदस्त तिमाही निकालाचा परिणाम शेअर्सवरही पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून ‘शॅलेट हॉटेल्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी होत आहे.

मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे चौपट केले आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयडीबीआय कॅपिटलच्या तज्ज्ञांच्या मते, ‘शॅलेट हॉटेल्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात 13 टक्क्यांनी वाढू शकतात. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ‘शॅलेट हॉटेल्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 3.56 टक्के वाढीसह 417.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

तीन वर्षांत 302 टक्के परतावा :
29 मे 2020 रोजी ‘शॅलेट हॉटेल्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 100.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 417 रुपयेवर पोहचला आहे. म्हणजे अवघ्या 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 302 टक्के परतावा कमावून दिला आहे. 12 मे 2022 रोजी ‘शॅलेट हॉटेल्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 276.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 19 ऑक्टोबर 2022 पर्यंत हा स्टॉक 48 टक्क्यांनी वाढून 409.85 रुपयेवर पोहचला होता.

पुढील वाटचाल :
ब्रोकरेज फर्म IDBI कॅपिटलच्या तज्ज्ञांच्या मते, ‘शॅलेट हॉटेल्स लिमिटेड’ कंपनीची मार्च तिमाही अंदाजापेक्षा चांगली गेली आहे. निव्वळ विक्री आणि मार्जिनच्या बाबतीत ही आतापर्यंतची सर्वोत्तम तिमाही होती. जानेवारी ते मार्च 2023 मध्ये त्याची व्याप्ती 74 टक्के आणि सरासरी दैनिक दर म्हणजेच ADR 11,304 रुपये होती.

मागील वर्षी मार्च तिमाहीत व्याप्ती 56 टक्के आणि ADR 5,429 रुपये होता. ADR म्हणजे हॉटेल्सची रूम भाड्याची सरासरी कमाई. मार्च 2023 तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री वार्षिक 128 टक्क्यांनी वाढली असून 337.9 कोटी रुपयेवर पोहचली आहे. तर कंपनीचा EBITDA 385 टक्क्यांच्या वाढीसह 152.4 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

मार्च 2023 च्या तिमाहीत ‘शॅलेट हॉटेल्स लिमिटेड’ कंपनीने 39.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 11.6 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. लोणावळ्यातील ड्यूक्स रिट्रीटचे अधिग्रहण करून कंपनीने आपल्या व्यवसायात नवीन शाखा सुरू केल्या आहेत. ब्रोकरेज फर्मने कंपनीच्या FY 2024 आणि FY 2025 मधील कमाईचा अंदाज वाढवला आहे. आणि तज्ञांनी 457 रुपये लक्ष्य किंमतीसाठी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Chalet Hotels Share Price today on 12 May 2023.

हॅशटॅग्स

Chalet Hotels Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x