
HDFC Bank Share Price | ‘हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन’ म्हणजेच HDFC बँकने गुरुवारी आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. HDFC कंपनीने तिमाही निकालांसह लाभांश वाटप करण्याची घोषणा देखील केली आहे. HDFC बँक आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 2200 टक्के लाभांश वाटप करेल. कंपनीने लाभांश वाटपासाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी HDFC बँक स्टॉक 1.02 टक्के घसरणीसह 1,658.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
लाभांश तपशील :
सेबीला दिलेल्या माहितीत HDFC बँक कंपनीने म्हंटले आहे की, कंपनी आपल्या 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 2200 टक्के लाभांश वाटप करणार आहे. म्हणजेच HDFC बँक आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 44 रुपये लाभांश देणार आहे. लाभांशासाठी HDFC बँकने रेकॉर्ड तारीख म्हणून 16 मे 2023 हा दिवस निश्चित केला आहे. आज ज्या लोकांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहील, कंपनी त्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करेल.
HDFC बँक 1 जून 2023 रोजी किंवा नंतर आपल्या गुंतवणूकदारांच्या खात्यात लाभांश जमा करेल. शुक्रवारी हा बँकिंग स्टॉक 0.89 टक्क्यांच्या वाढीसह 1667.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 6 महिन्यांत HDFC बँकचे शेअर्स फक्त 1.58 टक्के वाढले आहेत. या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परकी किंमत 1734.45 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 1271.60 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.