28 April 2024 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार?
x

Kirloskar Electric Share Price | 'किर्लोस्कर इलेक्ट्रिक' कंपनीचे शेअर्स लोकांना श्रीमंत बनवत आहेत, 1 वर्षात दिला 400 टक्के परतावा

Kirloskar Electric Share Price

Kirloskar Electric Share Price | ‘किर्लोस्कर इलेक्ट्रिक’ कंपनीचे शेअर्स मागील एक वर्षापासून कमालीची कामगिरी करत आहेत. अवघ्या एका वर्षभरात ‘किर्लोस्कर इलेक्ट्रिक’ कंपनीचे शेअर्स 22 रुपयांवरून वाढून 116 रुपयेवर पोहचले आहेत. ‘किर्लोस्कर इलेक्ट्रिक’ कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 397.22 टक्के परतावा कमावून दिला आहे.

भारतातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी LIC ने देखील या स्मॉलकॅप कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनीमध्ये LIC ने 1.26 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहे. आज बुधवार दिनांक 17 मे 2023 रोजी ‘किर्लोस्कर इलेक्ट्रिक’ कंपनीचे शेअर्स 0.43 टक्के वाढीसह 116.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

14 जून 2022 रोजी किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर 21.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 16 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 121.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सनी मागील 1 वर्षाच्या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्के नफा मिळवून दिला आहे.

YTD आधारे या कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 80.81 टक्के मजबूत झाले आहेत. 2 जानेवारी 2023 रोजी ‘किर्लोस्कर इलेक्ट्रिक’ कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 64.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 16 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 121.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 69.98 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40.27 टक्के अधिक कमाई करून दिली आहे.

LIC ची होल्डिंग :
मार्च 2023 तिमाहीच्या नवीन शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, भारतातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी LIC ने ‘किर्लोस्कर इलेक्ट्रिक’ कंपनीचे 8,34,457 शेअर्स होल्ड केले आहेत. याचा अर्थ LIC कडे किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनीचे 1.26 टक्के भाग भांडवल आहेत. किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनीमध्ये प्रवर्तकांचा वाटा 49.51 टक्के असून सार्वजनिक गुंतवणूकदारांचा वाटा 50.49 टक्के आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kirloskar Electric Share Price today on 17 May 2023.

हॅशटॅग्स

Kirloskar Electric Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x