14 June 2024 2:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 14 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 14 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NBCC Share Price | सरकारी शेअरने अल्पावधीत दिला 900% परतावा, ऑर्डरबुक मजबूत, पुढेही मल्टिबॅगर Reliance Power Share Price | शेअर प्राईस 30 रुपये! 5 दिवसात दिला 34% परतावा, गुंतवणुकीची संधी सोडू नका RVNL Share Price | RVNL स्टॉक देणार ब्रेकआऊट, PSU शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉकबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक 'BUY' करावा की 'Sell'? Reliance Infra Share Price | स्टॉक रॉकेट स्पीडमध्ये परतावा देणार, 5 दिवसात दिला 30% परतावा, खरेदीला गर्दी
x

Karur Vysya Bank Share Price | बँक FD जेवढं व्याज एका वर्षात देईल, तेवढा परतावा या बँकेचा शेअर 1 दिवसात देतोय, खरेदी करणार?

Karur Vysya Bank Share Price

Karur Vysya Bank Share Price | ‘करूर वैश्य बँक’ ने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. या मजबूत तिमाही निकालानंतर ‘करूर वैश्य बँक’ बँकेच्या शेअरमध्ये अद्भूत तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म ‘एचडीएफसी सिक्युरिटीज’ ने ‘करूर वैश्य बँक’ स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच तज्ञांनी शेअरवर 119 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. आज बुधवार दिनांक 17 मे 2023 रोजी ‘करूर वैश्य बँक’ चे शेअर्स 7.01 टक्के वाढीसह 104.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मार्च तिमाही निकाल तपशील :
आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत ‘करूर वैश्य बँक’ ने 59 टक्के वाढीसह 338 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत बँकेने 213 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2023 तिमाहीत बँकेने 2,169 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 1,615 कोटी रुपये होता.

बँकेचे व्याज उत्पन्नही वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीत 1,409 कोटी रुपये होते, जे आता वाढून 1,768 कोटी रुपयेवर पोहचले आहे. ‘करूर वैश्य बँक’ ने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 64 टक्के वाढीसह 1,106 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे, जो मागील आर्थिक वर्षात 673 कोटी रुपये होता.

लाभांशाची घोषणा :
करूर वैश्य बँकेच्या संचालक मंडळाने 31 मार्च 2023 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 2 रुपये म्हणजेच 100 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांश वाटप करण्याचा निर्णयावर शेअर धारकांची मंजुरी घेतली जाईल.

स्टॉक परफॉर्मन्स आणि परतावा :
मागील तीन वर्षात ‘करूर वैश्य बँक’ च्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 312 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत या बँकिंग स्टॉकने लोकांना 75.63 टक्के नफा कमावून दिला आहे. गेल्या एका वर्षात ‘करूर वैश्य बँक’ चे शेअर्स 132.16 टक्के वाढले आहेत. 15 डिसेंबर 2022 रोजी ‘करूर वैश्य बँक’ चे शेअर्स 116 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या बँकिंग स्टॉकच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 116.20 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 41.75 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Karur Vysya Bank Share Price today on 17 May 2023.

हॅशटॅग्स

Karur Vysya Bank Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x