6 May 2024 6:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Brightcom Group Share Price | 'ब्राइटकॉम ग्रुप' शेअरच्या तेजीला ब्रेक, शेअरची उलटी घसरगुंडी सुरू, गुंतवणूकदारांनी काय करावे?

Brightcom Group Share Price

Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअर्सची तेजी आता मंद होत आहे. मागील काही दिवसांपासून सतत अप्पर सर्किट तोडणाऱ्या ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअरमध्ये घसरण सुरू झाली आहे. आज हा स्टॉक लोअर सर्किटमध्ये अडकला होता. काल देखील शेअरची किंमत 5 टक्क्यांच्या घसरणीसह 15.77 रुपये किमतीवर आली होती. (Brightcom Group Share Price NSE)

पाच वर्षांपूर्वी हा स्टॉक 2.76 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज हा स्टॉक 14 रुपयेवर पोहोचला आहे. आज शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर्स 4.82 टक्के घसरणीसह 14.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Brightcom Group Share Price BSE)

10 डिसेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 117.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 69.80 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 9.35 रुपये होती. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 75 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. म्हणजेच एक वर्षभरापूर्वी या स्टॉकवर 1 लाख रुपये लावणाऱ्या लोकांचे गुंतवणुकीचे मूल्य 25,000 रुपयेवर खाली आले आहे.

ज्या लोकांनी 2023 या वर्षाच्या सुरुवातीला ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 54000 रुपयेवर आले आहे. सहा महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना लोकांना आता 56 टक्के तोटा सहन करावा लागत आहे.

एक महिनाभरापूर्वी या स्टॉक गुंतवणूक करणाऱ्यांना लोकांना 17 टक्के परतावा मिळाला आहे. कंपनीच्या लेख्यामधील अनियमिततेशी संबंधित प्रकरणात सेबीने दिलेल्या निर्णयाचा ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअर्सवर किंचित नकारात्मक परिणाम झाला होता. दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी देखील ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत.

शेअरबाबत तज्ञांचे मत :
शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक न करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरमध्ये कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. हा स्टॉक 112 रुपयांच्या उच्चांक किमतीवरून घसरुन 15.77 रुपयेवर आला आहे. जर तुम्हाला रिस्क घेऊन गुंतवणूक करायची असेल तर कमी प्रमाणात गंतवणूक करण्याचा सल्ला तज्ञ देत आहेत. (Brightcom Group Share Price Target 2025)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Group Share Price today on 19 May 2023.

हॅशटॅग्स

#Brightcom Group Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x