Nykaa Share Price | नायका कंपनीचा 1125 रुपयांचा शेअर 127 रुपयावर आला, गुंतवणूकदारांनी काय करावे?

Nykaa Share Price | ‘नायका’ ची मूळ कंपनी ‘FSN ई -कॉमर्स’ ने आपले जानेवारी-मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत ‘नायका’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात 71.8 टक्केची घट झाली असून कंपनीने फक्त 2.4 कोटी रुपये नफा कमावला आहे.

1 वर्षभरापूर्वी 9 कोटी रुपये निव्वळ नफा
एक वर्षभरापूर्वी याच तिमाही कालावधीत ‘नायका’ कंपनीने नऊ कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च तिमाहीत कंपनीचे ऑपरेशन्समधील महसूल 33.7 टक्क्यांनी वाढले आहे. आणि कंपनीने 1301.7 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

973.3 कोटी रुपये तिमाही महसूल
मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत ‘नायका’ कंपनीने 973.3 कोटी रुपये तिमाही महसूल संकलित केला होता. मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत ‘नायका’ कंपनीचा EBITDA 84 टक्के वाढीसह 70.6 कोटी रुपयेवर पोहचला होता. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीचा EBITDA 38.4 कोटी रुपये नोंदवला गेला होता. आज गुरूवार दिनांक 25 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.80 टक्के वाढीसह 127.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअरची वाटचाल :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 2.53 टक्के घसरणीसह 125.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरने सेन्सेक्सच्या तुलनेत लोकांना 47 % नकारात्मक परतावा दिला आहे. मागील सहा महिन्यांत ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 27.72 टक्के कमजोर झाले आहेत. (Nykaa Share Price NSE)

26 एप्रिल 2023 रोज़ी ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 114.30 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 1 जून 2022 रोजी ‘नायका’ कंपनीच्या शेअरने 257.66 रुपये ही उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. (Nykaa Share Price BSE)

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘नायका’ कंपनीचा IPO नोव्हेंबर 2021 शेअर बाजारात आला होता. या कंपनीने आपल्या IPO इश्यूमध्ये शेअरची किंमत 1125 रुपये निश्चित केली होती. जेव्हा स्टॉक लिस्ट झाला तेव्हा तो 2000 रुपयेच्या वर ट्रेड करत होता. स्टॉक लिस्टिंग मधून गुंतवणूकदारांनी दुप्पट नफा कमावला होता. यानंतर कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने अनेक मोठे निर्णय घेतले, त्यामुळे शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढू लागला.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nykaa Share Price today on 25 May 2023.