14 December 2024 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या
x

Mishtann Foods Share Price | मिष्टान फूड्स शेअर रोज 6% वाढत आहेत, 415 टक्के परतावा दिला, शेअरची किंमत 9 रुपये

Highlights:

  • आज शेअरची किंमत – BSE
  • नोमुरा सिंगापूर आणि मिष्टान फूड्स
  • 415 टक्के परतावा कमावून दिला
  • मध्य पूर्व आशिया आणि आफ्रिकेत प्रवेश करण्याची तयारी
Mishtann Foods Share Price

Mishtann Foods Share Price | ‘मिष्टान फूड्स’ कंपनीचे शेअर्स बुधवारच्या (24 May 2023) ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्के वाढीसह 7.72 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘मिष्टान फूड्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे, बासमती तांदूळ, डाळी आणि गहू या व्यवसायाशी निगडित कंपनीने भारतीय बाजारात नवीन उत्पादने लाँच करण्याची घोषणा केली आहे.

आज शेअरची किंमत – BSE
‘मिष्टान फूड्स’ कंपनी आयोडीनयुक्त मीठ, फिस्टल मीठ आणि रॉक सॉल्ट लाँच करण्याची तयारी करत आहे. याशिवाय कंपनी उत्तर-पूर्व बाजारपेठेतही व्यवसाय विस्तारत करण्याचा प्रयत्न करत आहे. आज सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी (Mishtann Foods Share Price BSE) या कंपनीचे शेअर्स 6.12 टक्के वाढीसह 9.19 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नोमुरा सिंगापूर आणि मिष्टान फूड्स
नोमुरा फर्मने ‘मिष्टान फूड्स’ कंपनीचे 1.28 कोटी शेअर्स खरेदी करून आपली गुंतवणूक वाढवली आहे. नोमुरा सिंगापूर फर्मने ‘मिष्टान फूड्स’ कंपनीचे 1,28,25,854 शेअर्स म्हणजेच 1.28 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहेत. मिष्टान फुड्स कंपनीने बासमती तांदळाच्या विविध प्रकारचे उत्पादन घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

गहू डाळी आणि मसाल्यांच्या विभागातही ‘मिष्टान फूड्स’ कपनीने आपली मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. मिष्टान फूड्स कंपनीचे अहमदाबाद शहराजवळ तांदूळ प्रक्रिया युनिट कार्यरत असून त्याची वार्षिक उत्पादन क्षमता 100000 मेट्रिक टन पेक्षा जास्त आहे.

415 टक्के परतावा कमावून दिला
मागील 5 वर्षात ‘मिष्टान फूड्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 415 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 ऑगस्ट 2018 रोजी ‘मिष्टान फूड्स’ कपनीचे शेअर्स 150 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 24 मे 2023 रोजी ‘मिष्टान फूड्स’ कंपनीचे 7.72 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 2 वर्षांत ‘मिष्टान फूड्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 250 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवडयांची उच्चांक पातळी किंमत 14.35 रुपये होती. 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 7.09 रुपये होती.

मध्य पूर्व आशिया आणि आफ्रिकेत प्रवेश करण्याची तयारी
‘मिष्टान फूड्स’ कंपनी मध्य पूर्व आशिया आणि आफ्रिकेत प्रवेश करण्याची तयारी करत आहे. ‘मिष्टान फूड्स’ कंपनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये Grow & Grub Nutrients FZ-LLC नावाची पूर्ण मालकीची उपकंपनी सुरू करणार आहे. ‘मिष्टान फूड्स’ कंपनीने सेबी फाइलिंगमध्ये कळवले आहे की, कंपनीने सध्या पूर्ण लक्ष आंतरराष्ट्रीय व्यापारावर केंद्रित केले आहे. ‘मिष्टान फूड्स’ कंपनी मध्य पूर्व आशिया आणि आफ्रिकेतील तांदळाच्या वाढत्या मागणीचा फायदा घेणार आहे, कंपनीचे म्हणणे आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mishtann Foods Share Price today on 25 May 2023.

FAQ's

How to Buy Mishtann Foods Share?

आपण मिष्टान्न फूड्स शेअर्स Zerodha Kite, Angel One App, Upstox Pro, 5paisa, ICICI Direct App and Groww वर डीमॅट खाते तयार करून आणि केवायसी कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करून खरेदी करू शकता.

What is the Share Price of Mishtann Foods?

कोणत्याही शेअरच्या शेअरची किंमत अस्थिर असते आणि वेगवेगळ्या घटकांमुळे दिवसभर बदलत राहते. 25 मे 2023 रोजी मिश्तान फूड्सच्या शेअरची किंमत रु.८.४८ आहे.

What is the Market Cap of Mishtann Foods?

मार्केट कॅपिटलायझेशन, मार्केट कॅपसाठी कमी, सार्वजनिकरित्या व्यवहार केलेल्या कंपनीच्या थकित शेअर्सचे बाजार मूल्य आहे. 25 मे 2023 पर्यंत मिश्तान फूड्सचे मार्केट कॅप 772 कोटी रुपये आहे.

What is the PE and PB ratio of Mishtann Foods?

मिश्तान फूड्सचे पीई आणि पीबी गुणोत्तर 25 मे 2023 पर्यंत 15.52258 आणि 7.63112 आहे.

What is the 52 Week High and Low of Mishtann Foods?

52 आठवड्यांचा उच्चांकी / नीचांकी दर ही सर्वोच्च आणि सर्वात कमी किंमत आहे ज्यावर मिश्टॅन फूड्सच्या स्टॉकने त्या दिलेल्या कालावधीत (1 वर्षासारखे) व्यवहार केला आहे आणि तांत्रिक सूचक मानला जातो. 25 मे 2023 रोजी मिश्तान फूड्सचे 52 आठवड्यांचे उच्चांकी आणि नीचांकी रु.14.35 आणि रु.7.09 आहेत.

हॅशटॅग्स

Mishtann Foods Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x