28 April 2024 3:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल
x

Expleo Solutions Share Price | मालामाल शेअर! या शेअरने 3 वर्षात 1 लाखावर दिला 9 लाख परतावा, मागील 1 महिन्यात 14 टक्के परतावा

Highlights:

  • Expleo Solutions Share Price
  • 1 लाखावर दिला 9 लाख परतावा
  • मागील एका महिन्यात 14.22 टक्के परतावा
  • चार्ट पॅटर्न
  • आर्थिक तिमाही
Expleo Solutions Share Price

Expleo Solutions Share Price | एक्स्प्लेओ सोल्युशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. एक्स्प्लेओ सोल्युशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 850 टक्के परतावा कमावून दिला आहे. 22 मे 2020 रोजी एक्स्प्लेओ सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 159 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज गुरूवार दिनांक 25 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के वाढीसह 1,472.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

1 लाखावर दिला 9 लाख परतावा :
तीन वर्षांपूर्वी एक्स्प्लेओ सोल्युशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 9.44 लाख रुपये परतावा मिळाला आहे. एक्स्प्लेओ सोल्युशन्स लिमिटेड या IT कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या एका वर्षात 17.26 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात 14.22 टक्के परतावा
या वर्षाच्या सुरूवातीपासून आतपर्यंत एक्स्प्लेओ सोल्युशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 25.09 टक्के मजबूत झाली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 14.22 टक्के परतावा कमावून दिला आहे. एक्स्प्लेओ सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1541 कोटी रुपये आहे.

चार्ट पॅटर्न
एक्स्प्लेओ सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सवर 68.4 अंकावर ट्रेड करत आहेत. यावरून कळते की हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनच्या मध्यम पातळीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअरचा 0.8 चा बीटा आहे, जो एका वर्षातील कमी अस्थिरता दर्शवतो. एक्स्प्लेओ सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचा स्टॉक 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किमतीच्या वर ट्रेड करताना आपण चार्ट पॅटर्नवर पाहू शकता.

आर्थिक तिमाही
डिसेंबर 2022 च्या तिमाहीत या कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या तिमाहीतील 11.38 कोटी रुपये नफ्याच्या तुलनेत 28.94 कोटी रुपये नफा कमावला आहे. डिसेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीची एकूण निव्वळ विक्री 105.84 कोटी रुपये होती. जी डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये 27.66 टक्के वाढून 135.12 कोटी रुपयेवर पोहचली आहे.

डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यात 83.55 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. या काळात कंपनीने 31.46 कोटी रुपये नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ ऑपरेटिंग नफा 17.14 कोटी रुपये होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Expleo Solutions Share Price today on 25 May 2023

हॅशटॅग्स

Expleo Solutions Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x