29 April 2024 2:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी?
x

बिहार: पाचव्या टप्यातील मतदानावेळी हॉटेलमध्ये आढळल्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्स

Loksabha Election 2019

पाटणा : सोमवारी बिहारमध्ये ५व्या टप्प्यासाठी मतदान सुरु असताना मुझफ्फरपूर येथील एका हॉटेलमध्ये २ ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स सापडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. विशेष म्हणजे हे हॉटेल मतदान केंद्रापासून अगदी जवळच्या अंतरावर होतं. हॉटेलमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स सापडल्याची माहिती मिळताच अनेक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला होता. सविस्तर वृत्तानुसार, सेक्टर मॅजिस्ट्रेट अवदेश कुमार यांच्याकडे मुझफ्फरपूर येथील ४ ईव्हीएम मशीन्सची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परिसरातील एखादं ईव्हीएम मशीन खराब झाल्यास बॅकअप म्हणजे अतिरिक्त मशीन्स ठेवण्यात आल्या होत्या.

दरम्यान, मुझफ्फरपूर येथून मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर ड्रायव्हरने आपल्याला मतदान करायचं असल्याने थोडा वेळ मागितला. यावेळी अवदेश कुमार हॉटेलमध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आणि कंट्रोल युनिटसोबत उतरले होते. काही वेळात निवडणूक अधिकारी ईव्हीएम मशीन घेऊन हॉटेलमध्ये थांबले असल्याची बातमी परिसरात पसरली. कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित करत आंदोलन करण्यास सुरुवात केली.

यानंतर काही वेळातच उप-विभागीय अधिकारी कुंदन कुमार हॉटेलमध्ये पोहोचले आणि ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन्स जप्त केल्या. ‘सेक्टर ऑफिसरला काही आरक्षित अतिरिक्त मशीन्स देण्यात आल्या होत्या. जेणेकरुन एखादी मशीन खराब झाल्यास ती बदली करता येईल. ईव्हीएमची बदली केल्यानंतर त्यांच्याकडे २ ईव्हीएम, १ कंट्रोल युनिट आणि २ व्हीव्हीपॅट त्यांच्या राहिल्या होत्या’, अशी माहिती मुझफ्फरपूरचे जिल्हा दंडाधिकारी आलोक रंजन यांनी दिली आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x