4 May 2024 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर
x

कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू | भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरींना पंतप्रधान करण्याची चर्चा, काँग्रेसचा गौप्यस्फोट

India corona pandemic

मुंबई, १९ मे | देशभरामध्ये कोरोनाची परिस्थती गंभीर बनत चालली आहे.कोरोना रूग्णांसोबतच मृत्यूचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये जगभरातून मोदींवर टिका केली जात आहे.मात्र दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरींच्या कामाचं मात्र कौतुक होतय.त्यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गडकरींना पंतप्रधान करायची चर्चा भारतीय जनता पक्षामध्ये चालु आहे असा गौप्यस्फोट केला आहे. ‘देशभरात कोरोनामुळे कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याचं सोयरसुतक नाही, नितीन गडकरी पंतप्रधान असायला हवं होतं, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

नाना पटोलें यांनी बोलताना भारतीय जनता पक्षामध्ये नितीन गडकरींना पंतप्रधान करण्याची चर्चा असल्याबाबत भाष्य केले आहे. भारतीय जनता पक्षामध्ये मोदींना हटवून गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा सुरू आहे. आम्हला आनंद आहे की महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय. मी नितीन गडकरी यांच्याविरोधात लढलो त्यावेळी त्यांनी भावी पंतप्रधान म्हणून मतं मागितली होती. म्हणून आनंद आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

नितीन गडकरी यांनी कोरोना लसीच्या वाढत्या मागणीवरुन दहा कंपन्यांना लसनिर्मितीची परवानगी देण्याचा सल्ला दिला होता. त्यावरुन नाना पटोले यांनी टोमणा लगावला. नाना पटोले म्हणाले, “मोदींसमोर नितीन गडकरींचं चालतं की नाही ठाऊक नाही, पण आम्हाला वाटतं की नितीन गडकरी हे पंतप्रधान असायला हवे होते. कोटी लोक देशात मरत आहेत, पण मोदींना सोयरसूतक नाही”

नाना पटोले यांनी आज मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्यांनी खतांचे वाढलेले दर, चक्रीवादळाने झालेले नुकसान, कोरोना लसीकरण अशा विविध गोष्टींबद्दल भाष्य केले आहे.नाना पटोले म्हणाले,मोदींसमोर गडकरींचं चालतं की नाही ठाऊक नाही, पण आम्हाला वाटतं की नितीन गडकरी हे पंतप्रधान असायला हवे होते. कोटी लोक देशात मरत आहेत, पण मोदींना सोयरसूतक नाही.

 

News English Summary: Speaking on the occasion, Nana Patole said that there is talk of making Nitin Gadkari the Prime Minister of the Bharatiya Janata Party. In the Bharatiya Janata Party, there is talk of removing Modi and making Gadkari the Prime Minister. We are happy that the man of Maharashtra is becoming the Prime Minister.

News English Title: BJP considering about replacing Nitin Gadkari as Prime minister after corona pandemic said Nana Patole news updates.

हॅशटॅग्स

#NanaPatole(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x