
Piramal Pharma Share Price | ‘पिरामल फार्मा’ कंपनीने नुकताच आपले आर्थिक वर्ष 2022-2023 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत ‘पिरामल फार्मा’ कंपनीने 155.57 टक्के अधिक कमाई केली आहे. ‘पिरामल फार्मा’ कंपनीच्या तिमाही निकालानंतर गुरुवारी शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळाली.
काल शेअर १२ टक्क्यांनी वाढला
काल या कंपनीचे शेअर्स १२ टक्क्यांच्या वाढीसह 83.80 रुपये किमतीवर पोहचला होता. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी ‘पिरामल फार्मा’ कंपनीचे शेअर्स 5.03 टक्के वाढीसह 82.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअरची कामगिरी :
मागील 5 दिवसांत ‘पिरामल फार्मा’ कंपनीच्या शेअरची किंमत 9.36 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 17.64 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 37.66 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.
मागील एका वर्षात पिरामल फार्मा कंपनीचे शेअर्स 56.66 टक्के घसरले आहेत. तर YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 32.78 टक्के कमजोर झाले आहेत. पिरामल फार्मा कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 63.10 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 200 रुपये होती.
कंपनीची आर्थिक कामगिरी :
मागील तिमाहीच्या तुलनेत मार्च तिमाहीत पिरामल फार्मा कंपनीचा निकाल शानदार आला आहे. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या कालावधीत पिरामल फार्मा कंपनीने 2188.08 कोटी रुपये कमाई केली आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या कालावधीत कंपनीचे एकूण उत्पन्न 1798.51 कोटी रुपये होते. या कंपनीने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत 50.11 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीला 90.18 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.
इतर तपशील :
YoY आधारावर पिरामल फार्मा कंपनीने 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत 2209.50 कोटी रुपयेच्या तुलनेत 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या कालावधीत एकूण 2188.08 कोटी रुपये कमाई केली आहे. कंपनीने 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या कालावधीमधील 204.06 कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याच्या तुलनेत 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या कालावधीमध्ये 50.11 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. म्हणजेच या तिमाही नफ्यात 75 टक्के घट पाहायला मिळाली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.