Vasa Denticity IPO | लॉटरी लागणार! लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी वासा डेंटिसिटी IPO 60 टक्क्यांहून अधिक परतावा देण्याचे ग्रे मार्केट संकेत

Vasa Denticity IPO | वासा डेंटिसिटी कंपनीच्या IPO चा सबस्क्रिप्शन कालावधी पूर्ण झाला आहे. या SME कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांच्या नजरा स्टॉक लिस्टिंगकडे लागले आहे. या कंपनीचे शेअर्स 2 जून 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे. वासा डेंटिसिटी कंपनीच्या शेअर्सने ग्रे मार्केटमध्ये केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे गुंतवणूकदारांना मजबूत स्टॉक लिस्टिंगची अपेक्षा आहे.

वासा डेंटिसिटी IPO GMP

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या ब्रोकरच्या मते वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 77 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून ग्रे मार्केट मधील वाढती किंमत सकारात्मक बाबत मानली जात आहे.

हा ट्रेंड जर पुढे असाच चालू राहिला तर, वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांना 60 टक्क्यांहून अधिक नफा कमावून देऊ शकतात. 26 मे 2023 रोजी वासा डेंटिसिटी कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 70 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते.

वासा डेंटिसिटी IPO ला मजबूत प्रतिसाद

वासा डेंटिसिटी कंपनीचा IPO 23 मे 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. तर 25 मे 2023 रोजी IPO ची मुदत पूर्ण झाली होती. 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरची किंमत बँड 121 रुपये ते 128 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. IPO उघडण्याच्या शेवटच्या दिवशी वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स 67.99 पट सबस्क्राईब झाले होते. Vasa Denticity IPO स्टॉक अवघ्या 3 दिवसात 73 पट सबस्क्राइब झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vasa Denticity IPO today on 29 May 2023.