24 April 2024 6:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

GRM Overseas Share Price | चमत्कारी शेअर! 10,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर दिला 10 लाख रुपये परतावा, 63 टक्क्यांनी स्वस्तात खरेदी करणार?

Highlights:

  • GRM Overseas Share Price
  • 10,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर 10 लाख रुपये परतावा
  • मागील एका वर्षांत शेअरची किंमत 63 टक्क्यांनी खाली
  • जीआरएम ओव्हरसीज कंपनीबद्दल थोडक्यात
  • कंपनीतील शेअर होल्डिंग डेटा
GRM Overseas Share Price

GRM Overseas Share Price | मागील काही वर्षांत ‘जीआरएम ओव्हरसीज’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा मिळवून दिला आहे. 10 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी जीआरएम ओव्हरसीज कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती त्यांना 10433 टक्के नफा मिळाला आहे.

10,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर 10 लाख रुपये परतावा

10 वर्षांपूर्वी जीआरएम ओव्हरसीज कंपनीच्या शेअरमध्ये 10,000 रुपये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आता 10 लाख रुपये नफा मिळाला असता. आज सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी जीआरएम ओव्हरसीज कंपनीचे शेअर्स 0.70 टक्के घसरणीसह 170.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका वर्षांत शेअरची किंमत 63 टक्क्यांनी खाली

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीआरएम ओव्हरसीज कंपनीचे शेअर्स 0.40 टक्क्यांच्या घसरणीसह 172.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 50 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. मागील एका वर्षभरात जीआरएम ओव्हरसीज कंपनीच्या शेअरची किंमत 63 टक्क्यांनी खाली आली आहे. 14 जानेवारी 2022 पासून GRM ओव्हरसीज कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 900 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज हा स्टॉक 170 रुपयेवर आला आहे.

जीआरएम ओव्हरसीज कंपनीबद्दल थोडक्यात

जीआरएम ओव्हरसीज या स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल 1032 कोटी रुपये आहे. जीआरएम ओव्हरसीज ही कंपनी मुख्यतः बासमती तांदळावर प्रक्रिया करणे आणि विपणन क्रियामध्ये व्यवसाय करते. ही कंपनी ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड प्रकारामध्ये व्यापार करत आहे. जीआरएम ओव्हरसीज कंपनीचा व्यवसाय भारतासोबत अनेक बाहेरील देशातही पसरलेला आहे.

कंपनीतील शेअर होल्डिंग डेटा

लेटेस्ट शेअर होल्डिंग डेटानुसार, GRM ओव्हरसीज कंपनीमध्ये प्रवर्तकानी एकूण 71.72 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. उर्वरित 28.28 टक्के हिस्सा वाटा जनतेनी होल्ड केला आहे. परकीय गुंतवणूकदार आणि सार्वजनिक शेअर होल्डिंग प्रमाण 0.07 टक्के आहे. तर किरकोळ गुंतवणूकदार 10.34 टक्के भाग भांडवल होल्ड करत आहेत. या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांनी गुंतवणूक केलेली नाही.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GRM Overseas Share Price today on 29 May 2023.

हॅशटॅग्स

#GRM Overseas Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x