30 April 2024 3:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून स्टॉकची सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर, अवघ्या 2 दिवसात दिला 40 टक्के परतावा, खरेदी करणार? RVNL Share Price | PSU शेअर मजबूत कमाई करून देतोय, अल्पावधीत 2200% परतावा दिल्यानंतर पुन्हा तेजीत येणार
x

Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर स्टर्लिंग टूल्स शेअरचा गुंतवणूकदारांना 105% परतावा, आता 100% डिव्हीडंड देणार, स्टॉक डिटेल्स पहा

Highlights:

  • Sterling Tools Share Price
  • गुंतवणूकदारांना 100% डिव्हीडंड देणार
  • कंपनीची तिमाही कामगिरी
  • मल्टीबॅगर स्टर्लिंग टूल्स शेअरचा परतावा
Sterling Tools Share Price

Sterling Tools Share Price | स्टर्लिंग टूल्स या ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या मल्टीबॅगर कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या शेअर धारकांना 100 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. स्टर्लिंग टूल्स कंपनीच्या संचालक मंडळाने लाभांश वाटपाची घोषणा केल्यानंतर स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. स्टर्लिंग टूल्स या स्मॉल कॅप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,524 कोटी रुपये आहे.

गुंतवणूकदारांना 100% डिव्हीडंड देणार

आज सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.014 टक्के घसरणीसह 356.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सेबीला दिलेल्या माहिती कंपनीने कळवले आहे की, 2022-23 या आर्थिक वर्षासाठी कंपनीने 2 रुपयांच्या दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक शेअरवर 2 रुपये म्हणजे 100 टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेत शेअर धारकांची मंजुरी घेणार आहे.

कंपनीची तिमाही कामगिरी

स्टर्लिंग टूल्स कंपनीने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकालासोबत लाभांश जाहीर केला आहे. मार्च तिमाहीत कंपनीने 25.03 टक्क्यांच्या वाढीसह 212.66 कोटी रुपये कमाई केली आहे. मागील वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत स्टर्लिंग टूल्स कंपनीचे एकूण उत्पन्न 170.09 कोटी रुपये नोंदवले गेले होते.

जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान स्टर्लिंग टूल्स कंपनीने 13 टक्क्यांच्या वाढीसह 7.77 कोटी रुपये नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने 6.88 कोटी रुपये नफा कमावला होता.

मल्टीबॅगर स्टर्लिंग टूल्स शेअरचा परतावा

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 1.50 टक्क्यांच्या वाढीसह 362 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील सहा महिन्यांत हा कंपनीच्या शेअरने लोकांना 37.02 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात शेअरची किंमत 105.18 टक्क्यांनी वाढली आहे. तर YTD आधारे या स्टॉकने लोकांना 35.62 टक्के परतावा कमावून दिला आहे. याचा अर्थ ज्या लोकांनी एक वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.95 लाख रुपये झाले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sterling Tools Share Price today on 29 May 2023.

हॅशटॅग्स

#Sterling Tools Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x