14 May 2024 12:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mobile Recharge Hike | बापरे! कोट्यवधी मोबाइल युजर्सना झटका लागणार! मोबाईल रिचार्ज खर्च 25% वाढणार Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, या 5 राशींसाठी पुढचे 17 दिवस अत्यंत लाभदायक, तुमची राशी कोणती? Mutual Fund SIP | पगारदारांची पसंती 'या' स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांना, नोकरदार वर्ग मालामाल होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! जुलैपासून बदलणार DA ची रक्कम, किमान वेतनात वाढ होणार RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

Himadri Speciality Chemical Share Price | संयमाचे फळ! हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल शेअरने 1 लाख गुंतवणुकीवर दिला 3.19 कोटी रुपये परतावा दिला

Highlights:

  • Himadri Speciality Chemical Share Price 
  • हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल शेअरची सध्याची किंमत
  • हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल शेअरने 1 लाख गुंतवणुकीवर दिला 3.19 कोटी रुपये परतावा
  • मागील 3 वर्षात दिला 319 टक्के परतावा
  • 1 वर्षात 85.40 टक्के परतावा कमावून दिला
Himadri Speciality Chemical Share Price

Himadri Speciality Chemical Share Price | हिमाद्री स्पेशालिटी केमिकल लिमिटेड या भारतातील टॉप स्पेशॅलिटी केमिकल्स कंपनीने ऑस्ट्रेलियामध्ये एक मोठा व्यापारी करार केला असल्याची बातमी आली आहे. हिमाद्री स्पेशॅलिटी कंपनीने ऑस्ट्रेलियन कंपनी सिकोना बॅटरी टेक्नॉलॉजीमध्ये मोठी गुंतवणूक केली असल्याची चर्चा होत आहे.

हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल शेअरची सध्याची किंमत

हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल कंपनीने सिकोना बॅटरी टेक्नॉलॉजीचे 12.79 टक्के भाग भांडवल 10.32 दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केले आहेत. सिकोना बॅटरी टेक्नॉलॉजी कंपनी मुख्यतः इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम आयन बॅटरीसाठी लागणाऱ्या उच्च क्षमतेच्या सिलिकॉन एनोड तंत्रज्ञानामध्ये एक्स्पर्ट मानली जाते. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.66 टक्के घसरणीसह 127.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल शेअरने 1 लाख गुंतवणुकीवर दिला 3.19 कोटी रुपये परतावा

हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल कंपनीचे शेअर्स 23 मे 2003 रोजी 40 पैशांवर ट्रेड करत होते. 31 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 127.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या शेअर धारकांना 31,837 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 23 मे 2003 रोजी हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.19 कोटी रुपये झाले असते.

मागील 3 वर्षात दिला 319 टक्के परतावा

हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षात लोकांना 319 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 30.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल कंपनीचे शेअर्स 31 मार्च 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर 127.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 131.50 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 55.40 रुपये होती.

1 वर्षात 85.40 टक्के परतावा कमावून दिला

हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल कंपनीच्या शेअर्सने मागील 1 वर्षात लोकांना 85.40 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 जून 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 68.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 31 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 127.75 रुपये किमतीवर बंद झाले होते. मागील 3 महिन्यांत या कंपनीची शेअरची किंमत तब्बल 58 टक्के वर गेली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Himadri Speciality Chemical Share Price today on 01 June 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x