Rain Alert | होय! लवकरच घामट्यापासून सुटका होणार आहे. मान्सूनबाबत मोठी बातमी समोर येत आहे. येत्या आठ जूनला महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. मान्सूनचा पाऊस पूर्वेकडून येणार असल्यामुळे तो वेळेत म्हणजे आठ जूनलाच महाराष्ट्रात सक्रिय होईल. 12 ते 17 तारखेपर्यंत त्याची तीव्रता वाढेल तर वीस तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रातभर सक्रिय होईल असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे.
आज पासून मान्सून पूर्व पावसाला सुरुवात
आज पासून मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होईल असेही त्यांनी सांगितलं. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभाग व पंजाबराव डख यांच्या पावसाच्या अंदाजात पुन्हा एकदा विसंगती पाहायला मिळत आहे.
पंजाबराव डख काय म्हणाले?
दरम्यान पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा हवामान विभागाच्या अंदाज व्यक्त करण्याच्या पद्धतीवर टीका केली आहे. मी शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने अभ्यास करतो, त्यामुळे मला पावसाचे ढग दिसतात. इतरांना ते दिसत नाहीत अशी अप्रत्यक्ष टीका डख यांनी राज्य सरकारच्या हवामान विभागावर केली आहे. तसेच पावसाचा अचूक अंदाज बांधण्यासाठी सर्व हवामान संस्थानी एकत्रित अभ्यास करण्याची गरज असल्याचंही ते यावेळी म्हणालेत.
जळगावात अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस
जळगावात वादळी वाऱ्यामुळे दाणादाण उडाली आहे. अचानकच्या वादळी वाऱ्यामुळे गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं आहे. तर रावेर, सावदा, फैजपूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. तब्बल अर्धा तासापर्यंत वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात येतोय. तर मुक्ताईनगर ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. या वादळीवादामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रचंड वादळी वाऱ्यामुळे जळगावमधील वीज पुरवठासुद्धा खंडित झाल्याचं पाहायला मिळालं.
हवामान विभागाचा अंदाज काय?
एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या या अंदाजामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. मात्र दुसरीकडे डख यांनी येत्या आठ जूनलाच राज्यात मान्सून सक्रिय होईल असं म्हटलं आहे. डख यांचा हा अंदाज खरा ठरल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला मळणार आहे.
News Title : Rain Alert Monsoon Update check weather report check details on 04 June 2023.
