14 May 2024 9:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Get Instant Loan | अचानक पैशांची गरज भासली आणि क्रेडिट कार्ड ही नाही? 'या' ५ सोप्या मार्गांनी झटपट कर्ज मिळेल

Highlights:

  • Get Instant Loan
  • क्रेड अॅपवरून घेऊ शकता कर्ज
  • बँक खात्यावरही घेऊ शकता कर्ज
  • पेटीएमकडून इन्स्टंट लोन मिळू शकतं
  • क्रेडिट कार्डद्वारेही मिळते कर्ज
  • इन्स्टंट लोन अॅप्सचा ही पर्याय आहे
How to Get Instant Loan

Get Instant Loan | आयुष्यात असे काही प्रसंग येतात जेव्हा आपल्याला अचानक पैशांची गरज भासते. बाहेरून पैसे मिळणे कठीण आहे. बँकेतून कर्ज घ्यायला गेलात तरी ते इतकं सोपं नसतं. कर्ज उपलब्ध असले तरी त्यावरील व्याज फार जास्त भरावे लागते. अशा वेळी व्यक्ती हतबल होऊन आता काय करावे हे च समजत नाही. आज आम्ही तुम्हाला झटपट लोन मिळवण्याचे 5 मार्ग सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही चुटकीसरशी पैसे मिळवू शकता.

त्वरित कर्ज मिळविण्याचे पर्याय

क्रेड अॅपवरून घेऊ शकता कर्ज

तात्काळ कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही क्रेड अॅपचा वापर करू शकता. यासाठी तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्याकडे असलेली सर्व क्रेडिट कार्ड्स वापरू शकता. काही दिवस सलग हे अॅप वापरल्यानंतर त्यात क्रेड कॅशचा पर्याय दिसू लागतो. यानंतर तुम्ही तिथे अर्ज करू शकता आणि लगेच लोन मिळवू शकता. या कर्जाची रक्कम तुमच्या परतफेड करण्याच्या क्षमतेच्या आधारे ठरवली जाते.

बँक खात्यावरही घेऊ शकता कर्ज

जे कुठेतरी काम करत आहेत, त्यांच्यावतीने पगार देण्यासाठी कुठेतरी सॅलरी अकाऊंट उघडले जाते. त्या पगाराच्या खात्यावर वेळोवेळी अनेक प्रकारच्या लोन ऑफर्स असतात. अचानक गरज पडल्यास तुम्ही त्या ऑफर्सचा फायदा घेऊ शकता. अशा कर्जाची मर्यादा तुमच्या पगारावर अवलंबून असते. यानंतर तुमच्या पगारातून कर्ज (इन्स्टंट लोन) भरले जाते.

पेटीएमकडून इन्स्टंट लोन मिळू शकतं

जर तुम्हाला अचानक गरज पडली तर तुम्ही पेटीएमचा ही आधार घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पेटीएम अॅप डाऊनलोड करून त्याचा सतत वापर करावा लागेल. यानंतर गरज भासल्यास त्या अॅपच्या माध्यमातून तुम्ही लोन (इन्स्टंट लोन) घेऊ शकता. कर्जाच्या रकमेसाठी तुम्हाला सर्वप्रथम अॅपवर तुमची मर्यादा शोधावी लागेल.

क्रेडिट कार्डद्वारेही मिळते कर्ज

जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्ही त्यातून कर्जही घेऊ शकता. आपल्या क्रेडिट कार्ड खात्यावर जाऊन चेक करा आणि तुम्हाला कळेल की तुमच्यासाठी काही इन्स्टंट लोन ऑफर आहे की नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर ही फोन करून कर्जाबद्दल विचारू शकता, ते तुम्हाला क्रेडिट कार्डवर कर्ज कसं घ्यायचं ते सांगतील. अनेकदा क्रेडिट कार्ड खात्यावर क्रेडिट लिमिटपेक्षा जास्त कर्जाची ऑफर मिळते.

इन्स्टंट लोन अॅप्सचा ही पर्याय आहे

हल्ली झटपट कर्ज देण्यासाठी ही अनेक अॅप्स बाजारात आली आहेत. यामध्ये धानी, नवी, पेसेन्स, मनी टॅप आदींचा समावेश आहे. गरज पडल्यास या अॅप्सच्या माध्यमातून तुम्ही लगेच कर्जही घेऊ शकता. मात्र लक्षात ठेवा की, या अॅप्सचे हप्ते वेळेवर भरत राहा, अन्यथा ते तुमच्यावर भारी व्याज लादू शकतात.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News : How to Get Instant Loan.

हॅशटॅग्स

#How to Get Instant Loan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x