
Varun Beverages Share Price | वरुण बेव्हरेजेस लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या FMCG कंपनीचे शेअर्स स्वस्त होणार आहेत. कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट ही जाहीर केली आहे. वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहेत.
कंपनीने या महिन्यात आपल्या शेअरचे विभाजन करेल, अशी माहिती मिळत आहे. आज बुधवार दिनांक 7 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.17 टक्के घसरणीसह 1,650.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
वरुण बेव्हरेजेस स्टॉक स्प्लिट रेकॉर्ड डेट
सेबीला दिलेल्या माहितीत वरुण बेव्हरेजेस कंपनीने म्हंटले आहे की, कंपनी 1 शेअरचे 2 तुकड्यामध्ये विभाजन करणार आहे. यासाठी कंपनीने 15 जून 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे. म्हणजेच या रेकॉर्ड तारीख पर्यंत ज्या गुंतवणूकदाराचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल, त्यांना स्टॉक स्प्लिटचा लाभ मिळेल, असे कंपनीने जाहीर केले आहे.
1 वर्षात पैसे दुप्पट
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 0.92 टक्क्यांच्या घसरणीसह 1689.40 रुपये किमतीवर क्लोज झाली होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 16 टक्के परतावा कमावून दिला आहे. एक वर्षापूर्वी वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करणाऱ्या लोकांचे गुंतवणुकीचे मूल्य 130 टक्क्यांनी वाढले आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.